मे व जून महिन्याचे अन्नधान्याचे वितरण सुरळीत पार पाडावे -छगन भुजबळ यांचे निर्देश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 19, 2020

मे व जून महिन्याचे अन्नधान्याचे वितरण सुरळीत पार पाडावे -छगन भुजबळ यांचे निर्देश


मुंबई : अन्न - नागरी पुरवठा विभागाकडून एप्रिल महिन्याचे अन्नधान्याचे वितरण सुरळीत पार पडले तसेच मे व जून महिन्याचे अन्नधान्य वितरण सुरळीत पार पाडावे असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले. 

  मंत्रालयात आज अन्न - नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची  आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री भुजबळ बोलत होते. 
          
या बैठकीत माहे मे व जून महिन्याच्या अन्नधान्य वितरणाचा आढावा, रेशनकार्ड नसलेल्या गरीबांसाठी धान्य वितरण करण्याबाबत केंद्र शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करणे, स्वस्त धान्य दुकानांसाठी विमा कवच, हमाल व वाहतूक कंत्राटदार यांना वेळेवर अनुदान उपलब्ध होणे, अन्न धान्य विकत घेण्यासाठी प्रलंबित अनुदान,सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे खाद्यतेल,भरडधान्य इ.वितरण करण्यासाठी नवीन योजना तयार करणे, तुरडाळ-चनाडाळ नियतन, उचल व वितरण व शिवभोजन उद्दिष्ट  या विषयांवर चर्चा झाली व विविध उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला.
    
कोव्हीड १९ च्या संकटावरील उपाय योजना च्या  नियमांचे पालन होण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखत सचिव आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत सदर आढावा बैठक पार पडली. बैठकीस अन्न,नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंदारे,मुंबई  नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा श्री.कैलास पगारे, सहसचिव सतिष सुपे,चारुशीला तांबेकर हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News