कोरोना : एकुण 2 हजार 420 नमुने निगेटिव्ह तर 182 अहवाल प्रलंबित ; 97 अहवाल पॉझिटिव्ह ; कोरोना मुक्त एकुण 30 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी : 60 रूग्ण घेताहेत उपचार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 18, 2020

कोरोना : एकुण 2 हजार 420 नमुने निगेटिव्ह तर 182 अहवाल प्रलंबित ; 97 अहवाल पॉझिटिव्ह ; कोरोना मुक्त एकुण 30 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी : 60 रूग्ण घेताहेत उपचार



नांदेड : कोरोना विषाणु संदर्भात सोमवार 18 मे रोजी सायं 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 19 हजार 611 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून एकुण 2 हजार 702 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 420 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकुण 182 चा अहवाल प्रलंबित आहे. यात घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 97 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 30 रुग्णांना कोरोना या आजारापासून मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
              उपचार सुरु असलेल्या 60 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 48 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे. औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News