कोरोना आणिबाणी व जैविक युद्ध ? -नवनाथजी रणखांबे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 18, 2020

कोरोना आणिबाणी व जैविक युद्ध ? -नवनाथजी रणखांबे



इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड विजेते
लेखक, कवी , साहित्यिक जीवन संघर्षकार नवनाथजी रणखांबे  हे "आठवणीतील डायरी " या सदराच्या माध्यमातून नियमीत आपल्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या लेखाचा भाग पहिला सादर करण्यात येत आहे. -संपादक

कोरोना आणिबाणी व जैविक युद्ध ?                                                                                                                              
         जैविक युद्ध म्हणजे काय ?    माझ्या मते   "जिवाणू आणि विषाणू यांचा प्रसार शत्रूच्या प्रदेशात करून शत्रू राष्ट्राची मानव, आर्थिक, सामाजिक विविध क्षेत्रात हानी करून शत्रू राष्ट्राचे खच्चीकरण  करणे होय". थोडक्यात सांगायचे झाल्यास  शत्रूचा नाश करण्यासाठी साथीच्या रोगाच्या रोगजंतूंचा प्रसार शत्रूच्या प्रदेशात करून शत्रूस जेरीस करणे होय. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे   हा संपर्कातून वाढतो. याचे संक्रमण साथीचा रोग ओळखून उपाय योजना  न केल्यास हा फार मोठ्या प्रमाणात मनुष्य, प्राणी आणि  विविध क्षेत्रात न भरून येणारी  हानी करतो. हा अदृश हल्ला न परवडणारा असतो.                                                         
जैविक युद्धाचा उदय                             

जैविक युद्ध हे  पूर्वीपासून जगात अस्तित्वात होते.  शत्रूचे खच्चीकरण करण्यासाठी मानव, प्राणी व वनस्पतीवर रोग उत्पन्न करणारे विषाणू या जैविक युद्धात सोडले जातात.  शत्रूच्या पाणवठ्यावर साथीच्या रोगाच्या विषाणूचा हल्ला करणे त्यासाठी  संसर्गजन्य साथीच्या रोगाने मेलेल्या माणसाचा मृत्य देह त्यात टाकणे अथवा वेगळी पद्धत अवलंबून जैविक युद्धाने शत्रूस जेरीस आणून शत्रूचे कंबरडे मोडून परत त्याच्यावर शस्त्रांचा हल्ला करून शत्रूस पराभूत केले जात असे. उदा. प्लेग, कॉलरा, इतर साथीचे आजार  इत्यादींचा वापर करीत असे.                                                   जैविक युद्धाचा इतिहास पाहिला तर प्रथम ब्रिटनेने याचा वापर १७६३ मध्ये केला असे बोलले जाते. अठराव्या शतकात कॅनडावर कब्जा मिळवण्यासाठी ब्रिटिश आणि  फ्रान्स यांच्यात  युद्ध झाले. अमेरिकेतील मूलनिवासी यांनी फ्रान्सला  पाठिंबा दिला. त्यावेळी स्मॉल कॉच व्हायरसचा वापर ब्लॅंकेटद्वारा केला. ह्या ब्लॅंकेट अमेरिकेतील मूलनिवासी यांना देण्यात आल्या. अशा प्रकारे त्यांच्यात ब्लॅंकेटद्वारे  साथीचा रोग पसरवला.  पहिल्या महायुद्धात ही जर्मनीने  रशियावर विविध विषाणूचा मारा करून  जैविक युद्धाचा वापर केला होता. पहिल्या महायुद्धातील मोठ्या प्रमाणात झालेली प्रचंड मानव व विविध क्षेत्रातील हानी पहाता. पुढे जीनेव्हा प्रोटोकॉलला मान्यता देऊन विविध जैविक अस्त्रांच्या वापरावर बंदी घातली. दुसरे महायुद्ध झाले त्यातही जैविक युद्ध कलेचा वापर जपान, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन इ. देशांनी केला विविध विषाणूंचा मुक्त वापर केला . हे दुसरे महायुद्ध ही  पहिल्या महायुद्धा पेक्षा ही भयानक असे फार मोठे मानवाचा संहार करणारे आणि  विविध क्षेत्रात हानिकारक करणारे ठरले.  ही न भरून येणारी हानी आणि युद्ध  जगाला न परवडणारे आहे म्हणूनच म्हणतात जगाला युद्ध नको बुद्ध हवा आहे.  या भयंकर संहारास कारणीभूत ठरणाऱ्या बाबीवर बंदी घातली. संयुक्त राष्ट्र संघाने जैविक हत्याराच्या निर्मितीवर बंदी आणली.  निसर्ग निर्मित जैविक साथीवर उपाय शोधण्यास संशोधनास मोकळीक दिली. यामुळे विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रयोगाच्या नावाने जैविक विषाणूंची निर्मती केली यात काही देशाचे  पितळ उघडे पडले. कांही देशाने  जैविक युद्धाचा वापर केला. जैविक युद्धाचा  कळत न कळत मानव जातीला फार मोठी किंमत मोजावी लागली/ लागते. हे काही नवे नाही. पण आजचे कोरोना संकट फार भयानक आहे.
          हा  कोरोना चीनच्या वुहान  प्रांतातून आला हा मानव निर्मित आहे ? की निसर्ग निर्मित ?  हा वादाचा विषय ठरला आहे. वटवाघूळ या प्राण्यांमध्ये आढळणारा हा कोरोना विषाणू आहे. त्याचे संक्रमण माणसात कसे झाले ?  हा महत्त्वाचा मुद्दा असून चीनी लोकं विविध प्राणी आणि पक्षांचेही मास खातात.  हा आजार जगापासून चीनने का लपवला ?   वुहान  मधील माहिती अमेरिकेने मागवली असता ती देण्याचे चीनने का नाकारले ?    चीनने या कोरोना विषाणूची   निर्मिती केल्याचा आरोप ठेवून बऱ्याच देशांनी चीनला भरपाई मागितली आहे. तर चीनने कोरोना विषाणू निर्मितीचा आरोप आणि त्यांच्यावर इतर ठेवलेले आरोप फेटाळले आहेत. चीन विरोधात कांही देश  कोरोना हा  विषय आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन गेले आहेत. कोरोना विषाणू हा मानव निर्मित की निसर्ग निर्मित आहे  ?  हे सांगणे आवघड आहे ?  पुढे काय होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे.  चीनने जैविक युद्ध तर छेडले नसेल ना ?   वटवाघूळ या प्राण्यांच्यामध्ये मुख्यत्वे  सापडणारा हा  कोरोना विषाणूने मानवाला कसे संक्रमित केले हा महत्त्वाचा मुद्दा ? जागतिक आरोग्य संघटनेने या आजरास कोविड - १९ असे नाव दिले आहे.                           कोरोना हा मुख्यत्वे प्राणी जगतातून मानवाकडे आला आहे. विविध २०००(दोन हजार जातीत असणारा ) वटवाघूळ हा आकाशात उडणारा पक्षी नसून तो एक सस्तन प्राणी असून त्याची माधी  लहाण्यांना स्तनपान करतात. कांही वटवाघूळ फळं, फुल, किटक खातात तर कांही वटवाघूळ झोपेत असणाऱ्या प्राण्यांच्या रक्तावर ताव मारतात. यांना सरळ उभा राहता येत नाही म्हणून ते स्वतःला झाडाला उलटे टांगून घेतात.  आशा ह्या वटवाघळातून कोरोनाचे संक्रमण माणसात कसे झाले ?  ते चीनने केलेला मानव निर्मित  आहे का ?  निसर्ग निर्मित आहे ?  हाच मुद्दा जगात कळीचा ठरला आहे . काळच या प्रश्नाचे कोडे उलगडणार आहे!                                   डोळ्याने ही न दिसणारा हा विषाणू पूर्ण जगाचा विनाश करू शकतो.  आज कोरोनाने जगाला विटीस  धरले आहे.  चीनच्या वुहान  प्रांतातून जगभर पसरलेल्या  कोरोनामुळे आज  जगात करोडो जिंदगी या कोरोना संकटाचा सामना  करीत आहेत. जगात आर्थिक मंदी येऊन जग आर्थिक अडचणीत आहे. प्रचंड प्रमाणात मनुष्य हानी होत आहे. जगभरात पावणे तीन लाखहून जास्त लोक आज या कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत तर ४२ लाखाहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगातील मोजक्या १८ देशात कोरोनाने शिरकाव केला नाही.  कोरोना रोखण्यास काही दक्ष राष्ट्रांना यश  आले आहे. भारत हा लोकसंख्येने आणि क्षेत्रफळाने मोठा देश आहे. काही मोठया शहरात प्रचंड लोकवस्ती आणि वर्दळ आहे. उदा. मुंबई, पुणे,  शहर.   आजरोजी   भारतात ९०,९२७  कोरोना ग्रस्त रुग्ण  आहेत आणि बळींची संख्या २८ हजार पार केला  तर  कोरोना मुक्त ३४, १०९ रुग्ण बरे झाले आहे आहे.  कोरोनाच्या संकटसाठी मदत म्हणून जागतिक बँकेने १०० कोटींची मदत भारताला केली आहे.  भारत सरकारने विविध क्षेत्रासाठी आणि कोरोना विरुद्ध विविध पॅकेज जाहीर केली आहेत. भारतात कोरोनाचे तीन टप्पे झाले पहिला टप्पा २५ मार्च ते १४ एप्रिल यादरम्यान झाला. दुसरा टप्पा १४ एप्रिल ते ३ मे दरम्यान झाला. तिसरा टप्पा ४ मे ते १७ मे पर्यतचा झाला.  लॉक डाऊनचा चौथा टप्पा  १८ मे  ते ३१ मे पर्यत जाहीर झाला आहे . लॉक डाऊन वाढत आहे कारण कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. जागरूकता आणि खबरदारी घेणे काळाची गरज आहे. कोरोनाचा वाढत्या प्रभावा प्रमाणे   रेड ,  ऑरेंज, आणि  ग्रीन झोन बनवले आहेत. यात रेड झोनमध्ये खूपच दक्षता घेण्याचीच गरज आहे.  प्रशासनाने ज्या नियमावली दिल्या आहेत त्यानुसार सर्वांनी वाटचाल करणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्रात ३० हजार कोरोनाग्रस्त रुग्ण  आहेत. महाराष्ट्रातील  ७०८८ हजार रुग्ण बरे झाले आहेत तर राज्यातील कोरोना बळीचा आकडा एक हजार पार झाला आहे.  देशाची आर्थिक राजधनी मुंबईत   १७ हजार रुग्ण कोरोनाचे आहेत. प्रशासनाने सांगितलेल्या गाईड लाईन नुसार   सर्वांनी राहिले पाहिजे. 
         जैविक हल्ल्यापासून आपली सुरक्षा करण्यासाठी प्रत्येक माणसाने स्वतः दक्ष राहून  स्वतः स्वतःची काळजी घेऊन  सुरक्षा ठेवणे हा  महत्त्वाचा उपाय आहे. कार्यक्षम आणि सर्वोत्कृष्ठ प्रशासन सेवा, तात्काळ रोग उपचार पद्धती, रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करणे फार महत्त्वाचे आहे.  नैसर्गिक अथवा मानव निर्मित जैविक आणिबाणी निर्माण झाल्यास याविरुद्ध लढणारी कार्यक्षम आणि दक्ष व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी काळजी  घेणे आज काळाची गरज आहे. असे मासे ठाम मत आहे.                                                                                जैविक  संकटात  आर्थिक स्थतीमुळे मानवाची मनस्थिती खालावते.  हातावर पोट भरणारे कष्टकरी  काम धंदा नसल्यामुळे  गावाकडे त्यांनी   रस्ता पकडला. बेकारीमुळे स्थलांतर वाढले आहे.  घरात उपाशी राहून मरण आणि  बाहेर कोरोनामुळे मरण आहे . मरण तर दोन्ही बाजूनी आहे म्हणून कांही मजूर  कोरोनाशी दोन हात करत गावी पायी चालत गेले आणि जात आहेत तर काहींना आता शासनाने  रेल्वे आणि बसद्वारे घरी सोडले/ सोडत आहे. भारत सरकारने कोरोना संकट चांगल्या प्रकारे हाताळले आहे. यात प्रशासन आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.  समाजातील विविध स्तरातून दानशूर लोकांच्या मदतीचा हात सुरू आहे.   हे ही दिवस जातील असे म्हणतात ते काही खोटे नाही. प्रशासनाने केलेल्या नियम आणि अटी नुसार  त्याचे पालन करून आपण स्वतःची काळजी घेऊया . आता  कोरोनाला हरवूया.                जैविक आणिबाणी व त्याचे दुष्परिणाम न परवडणारे आहेत. आता जगाने जैविक अस्त्रांचा विनाश करायला हवा. जैविक युद्ध हे मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित खूप भयंकर असल्याने फार मोठे संकट जग झेलत आहे. मानव आणि विविध क्षेत्रातील न भरून येणारी हानी पहाता जैविक अस्त्रांची निर्मिती न करणे.  संशोधनाच्या नावाखाली जैविक संहार करून दहशत माजवण्यास मनाई करणे काळाची गरज आहे. यातच जगाचे आणि मानवांचे  कल्याण आहे ! असे माझे ठाम मत आहे.          
        
-©नवनाथजी रणखांबे, 
(लेखक हे इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड विजेता आहेत.)


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News