मुखेड,भोकर प्रत्येकी एक व नांदेडमध्ये आढळले दोन रुग्ण ; आजचे चार अहवाल पॉझिटिव्ह ;तर कोरोनाचे सहा रुग्ण बरे ; आतापर्यंत 36 रुग्णांना रुगालयातून दिली सुट्टी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 20, 2020

मुखेड,भोकर प्रत्येकी एक व नांदेडमध्ये आढळले दोन रुग्ण ; आजचे चार अहवाल पॉझिटिव्ह ;तर कोरोनाचे सहा रुग्ण बरे ; आतापर्यंत 36 रुग्णांना रुगालयातून दिली सुट्टी


नांदेड : जिल्ह्यात आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 24 हजार 600 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 2 हजार 761 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 462 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून आज 31 नवीन व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले व 46 स्वॅब प्रलंबित असे एकूण 63 स्वॅबची तपासणी चालू आहे. घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 110 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी 20 मे रोजी पंजाब भवन यात्री निवास येथील 6 रुग्ण औषध उपचारामुळे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
नवीन 8 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्ण पुरुष असून त्यांचे वय वर्षे अनुक्रमे 4, 25, 34, 54, 55 आहे, तर तीन स्त्री वय वर्षे अनुक्रमे 28, 41, 50 आहे. त्यापैकी 6 रुग्ण कुंभार टेकडी, एक करबला व एक अबचलनगर येथील असून त्यांच्यावर पंजाब भवन येथे औषध उपचार घेत आहेत. 
        आता नवीन आढळेल्या चार रुग्णामध्ये आणि नांदेड शहरातील़ श्रेय नगर वसांगवी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे. आज 20 मे 2020 रोजी पंजाब भवन यात्री निवास येथील 6 रुग्ण औषध उपचारामुळे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
एकुण  110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला व 36 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 63 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालयात बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु आहे.
सर्व जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ऍप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती
बुधवार 20 मे रोजी सायं. 5 वाजेपर्यंत

• नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण संशयित – 2749, 
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2510, 
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 1112, 
• अजून निरीक्षणाखाली असलेले – 198, 
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -47, 
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2463, 
• एकुण नमुने तपासणी- 2761, 
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 110, 
• पैकी निगेटीव्ह – 2462, 
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 63, 
• नाकारण्यात आलेले नमुने – 14, 
• अनिर्णित अहवाल – 109, 
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5, 
• जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 24 हजार 600 घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

आज दिनांक २०/०५/२०२० रोजी सायंकाळी ०७.०० वाजता कोरोना विषाणु संदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, आता प्राप्त झालेल्या एकूण १४ अहवाला पैकी ४ रुग्ण पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझीटिव्ह रुग्ण संख्या ही ११० झालेली आहे . उर्वरीत आज पाठविण्यात आलेले ३१ नविन व्यक्तींचे स्वब घेण्यात आले व ३३ स्वव प्रलंबीत असे एकूण ६४ स्वची तपासणी घालू आहे . ४ पॉझीटीव्ह रुग्णांपैकी ४ रुग्ण पुरुष ( अनुक्रमे वय वर्षे २४ , ३२ , ३३ , ५४ ) आहेत . त्यापैकी १ रुग्ण स्नेहनगर पोलीस कॉलनी , १ रुग्ण सांगवी , नांदेड १ ता . मुखेड व १ भोकर येथील असून त्यांच्यापैकी २ रुग्ण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे , १ रुग्ण उपजिल्हा रुग्णालय , मुखेड व १ रुग्ण ग्रामीण रुग्णालय , भोकर येथे औषध उपचार घेत आहेत . सद्यःस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे . त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे . एकूण ११० रुग्णांपैकी ५ रुग्णांचा मृत्यु झाला व ३६ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . ६७ रुग्णांपैकी १० रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोयीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ५१ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय वारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटर मध्ये २ रुग्ण , २ रुग्ण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे , १ रुग्ण उपजिल्हा रुग्णालय , मुखेड व १ रुग्ण ग्रामीण भोकर येथे असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतू ऍप ” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते . 



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News