आज आढळले सहा कोरोना पॉझिटिव्ह ;
पाच कोरोना मुक्त रुग्णांना सुटी : आतापर्यंत ११६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४१ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी
नांदेड : गुरुवारी (दि. २१ मे २०२० रोजी ) रात्री नऊ वाजता ओरोग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण नमुन्यांच्या अहवालां पैकी ०६ नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यापैकी ०२ रुग्ण गाडीपुरा या भागातील असुन त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे, ०१ रुग्ण यात्री निवास, नांदेड येथे दाखल आहे , ०२ रावण कुळा , तालुका मुखेड, येथील रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहे. ०१ केरुर, तालुका बिलोली येथील रहिवासी असून तो बिलोली येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल आहे.
आज गुरूवारी ( दिनांक २१/०५/२०२० रोजी ) सायंकाळी ०५.०० वाजता कोरोना विषाणु संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक २१/०५/२०२० रोजी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड येथील ३ रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बारड येथील कोवीड केअर सेंटर मधील १ रुग्ण व यात्री निवास एनआरआय कोवीड सेंटर येथील १ रुग्ण असे एकूण ५ रुग्णांना बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . आतापर्यंत ११० पॉझेटिव्ह रुग्णांपैकी ४१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरीत ६२ रुग्णांवर औषध उपचार चालू आहे. अशी माहिती सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली होती. परंतु रात्री नऊ वाजता मिळालेल्या अहवालावरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चिंता वाढली आहे.
आज पर्यंत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे १२६७ १६ व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकूण २८२७ रुग्णांचे स्वब घेण्यात आले आहेत . त्यापैकी २४६१ स्वैब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकूण आज पाठविण्यात आलेल्या ६६ रुग्णांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होतील व ६४ रुग्णांचे स्वॅब तपासणी चालू आहे . सदर घेतलेल्या एकूण स्वॅब पैकी ११६ तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आलेले आहेत . एकूण ११६ रुग्णांपैकी ६ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे व ४१ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे , ६८ रुग्णांपैकी १०. रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ५२ रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटर मध्ये १ , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ३, बिलोली येथे १ व ग्रामीण रुग्णालय भोकर येथे १ रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप " डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते . असे आरोग्य विभागाच्या वतीने कळविले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 21/05/2020 वेळ 09.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 2781
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2578
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1182
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 157
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 61
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2517
• आज घेतलेले नमुने - 66
• एकुण नमुने तपासणी- 2833
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 116
• पैकी निगेटीव्ह - 2461
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 124
• नाकारण्यात आलेले नमुने - 14
• अनिर्णित अहवाल – 109
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 41
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 6
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 126716 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment