खते, बी-बियाणे खरेदीची दुकानदाराकडून पावती घ्या ; कृषि विभागाचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, May 24, 2020

खते, बी-बियाणे खरेदीची दुकानदाराकडून पावती घ्या ; कृषि विभागाचे आवाहन


नांदेड  : खरीप हंगामासाठी खते, बि-बियाणे, कीटकनाशके खरेदी केल्यानंतर संबंधित दुकानदाराकडून संपूर्ण विवरणासह बिल पावती घ्यावी, असे आवाहन धर्माबाद येथील तालूका कृषि अधिकारी माधुरी उदावंत व  पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास अधापूरे यांनी केले आहे.
             शेतकरी अत्यंत कष्टाने शेती पिकवत असतो. अशावेळी खते, बि-बियाणे, कीटकनाशके, मशागत आदी कामासाठी त्याला आर्थिक गुंतवणूकही करावी लागते. त्यामुळे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गुणवत्ता व चांगल्या दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कृषी निविष्ठा विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, भेसळीची शंका दूर करण्यासाठी सीलबंद, वेष्टनातील, लेबल असलेले बियाणे खरेदी करावे, वैध मुदतीची खात्री करावी, पिशवीवर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्त दराने खरेदी करू नये. खरेदी केलेल्या बियाण्याचे पीक, वाण, लॉट नंबर, वजन, बियाणे ज्या कंपनीचे आहे ते नाव, किमान किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्याचे नाव व सही असलेली रोख अथवा उधारीची पावती घ्यावी. ही पावती तसेच वेष्टन बॅग, त्यावरील लेबल व त्यातील थोडे बियाणे या गोष्टी पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवाव्यात. काही शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News