नांदेड : आज रविवार ( दिनांक २४/०६/२०२० रोजी ) संध्याकाळी ०८.०० वाजता कोरोना बिपाणु संदर्भात आलेल्या अहवालानुसार दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
आज दिनांक २४/०५/२०२० रोजी प्राप्त झालेल्या एकूण २ अहवाला पैकी नवीन २ रुग्णांचे स्वॅब हे पॉझीटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या १२७ झाली आहे . आता प्राप्त झालेल्या २ पॉझीटिव्ह रुग्णांपैकी शिवाजीनगर येथील १ व विवेकनगर येथील १ रुग्ण ( २ पुरुष वय ६१,४० वर्षे ) . या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे . आज दिनांक २४/०५/२०२० रोजी एनआरआय भवन व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथील ४ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . आतापर्यंत १२७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५९ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरीत ६२ रुग्णांवर औषध उपचार चालू आहे .
दिनांक २४/०५/२०२० कोरोना संशयीत व कोविड रुग्णांचा संक्षीप्त माहिती तक्ता :
१. सर्वेक्षण १३२०९१
२. घेतलेले स्वब ३२५४
३. निगेटीव्ह स्वैब २७४६
४.आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या ०२
५.एकूण पॉझीटीव्ह रुग्ण १२७
६. स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १२२
७. स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या १४
८. मृत्यू संख्या ०६
९. सुट्टी दिलेली संख्या५९ १०.रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ६२
११. स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या २४१
एकूण १२७ रुग्णांपैकी ६ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे व ५५ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . ६२ रुग्णांपैकी ०७ रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ४७ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ५ , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे १ रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे १ रुग्ण असून व १ रुग्ण नांदेड येथील खाजगी रुग्णालय या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतू ऍप " डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते . असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.




No comments:
Post a Comment