ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सूचना - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 27, 2020

ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सूचना


मुंबई : ऑनलाईन व डिजीटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 
              शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. 
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, सर्वांना शिक्षण ही संकल्पना घेऊन आता आपण पुढे जाऊ. संपूर्ण साक्षरतेचा विचार करू. शिक्षणासाठी मोबाईल कंपन्यांचेही सहकार्य घेण्यात यावे. शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्डच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा पर्यायही आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घ्यावा. टीव्ही चॅनल्सचा यासाठी उपयोग करून घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.
 शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून यासंदर्भात लोकप्रतिनिधी व शिक्षण क्षेत्रातील सर्वांशी समन्वय राखावा, सर्वांची मते विचारात घ्यावीत. यानिमित्ताने ऑनलाइन नेटवर्कही बळकट करून घ्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले. 
यावेळी शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, प्रधान सचिव सौरभ विजय यांनी माहिती देतांना सांगितले की, बालभारतीने पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दीक्षा ॲपचा वापरही वाढला असून व्हायरस वीर पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. गुगल क्लासरूमचा तसेच रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओचा वापर करण्यात येणार आहे.शालेय पोषण आहार यासंदर्भात शाळांना स्वातंत्र्य देण्यात येत असून महाविद्यालये सुरू करण्याबाबतही नियोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News