सम्राट अशोकांची २३३० वी जयंती आदिलाबादेत उत्साहात साजरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, March 26, 2026

सम्राट अशोकांची २३३० वी जयंती आदिलाबादेत उत्साहात साजरी

 



आदिलाबाद (तेलंगाणा) : गुरुवारी (ता, २६.०३.२०२६ ) भारतीय बौद्ध सभा जिल्हा शाखेच्या वतीने आदिलाबाद येथील कैलास नगरमधील  अशोक बुद्ध विहार येथे सम्राट अशोक यांची २३३० वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. 

      सर्वप्रथम धूप दीप प्रज्वलित करून तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर, भदंत आर्य संघमित्रा यांच्या हस्ते बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  भारतीय बौद्ध महासभा तेलंगणा राज्याचे सरचिटणीस प्रज्ञाकुमार रत्नझाडे, डॉ. बी. आर. बुद्धा सभेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल भुक्ते हे होते. 

         याप्रसंगी डॉ .आंबेडकर मेमोरियल असोसिएशनचे भीमराव वाघमारे आपल्या भाषणात असे म्हणाले की , जगाला शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत गौतम बुद्धांनंतर जगभरात बौद्ध धर्माच्या प्रसाराबद्दल सम्राट अशोकांचे महा कार्य आहे . पुढे  ते म्हणाले की, कलिंग युद्ध जिंकल्यानंतर, सम्राट अशोक  रक्तपात आणि नद्यांप्रमाणे वाहणारे रक्त पाहून भावनाविवश झाले आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी जगात ८४ हजार बौद्ध स्तूप बांधले. तसेच नालंदा, तक्षशिला, पंचशिला यांसारखी महान विद्यापीठे, तसेच मोठे रस्ते आणि रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्यात आली आहेत.  सम्राट अशोकाचे दोन पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी परदेशात पाठवण्यात आले होते.  व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, जपान, थायलंड आणि इतर अनेक राष्ट्रांचे बौद्ध राष्ट्रांमध्ये रूपांतर करण्याचे श्रेय सम्राट अशोक आणि त्यांच्या पुत्रांना जाते. 

          कार्यक्रमाला भारतीय बौद्ध सभेचे जिल्हा सरचिटणीस दयानंद पोटफोडे, केंद्रीय शिक्षक कांताराव वाघमारे, सचिव आम्रपाला दगडे, माजी अध्यक्ष दयानंद कांबळे, उपाध्यक्ष कृषीवर्त लुंडगे, डॉ.बी.आर. आंबेडकर मेमोरियल असोसिएशनचे सरचिटणीस दादासाहेब जबाडे, रंगाराव वाठोरे, वैजयंती कानिंदे, राधा मसदे, अनिताबाई कामले, सुलोचना जबाडे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News