नांदेड : आज एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला ; तर बरे झाल्याने चार रुग्णांना सुटी देण्यात आली.आतापर्यंत १३८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरीत ४३ रुग्णांवर औषध उपचार चालू आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
आज गुरूवारी (दिनांक २८/०५/२०२० रोजी ) सायंकाळी ०५.०० वाजता कोरोना विषाणु संदर्भात आरोग्य विभागाने दिलेली सविस्तर माहिती अशी : आज दिनांक २८/०५/२०२० रोजी प्राप्त झालेल्या एकूण ४९ अहवाला पैकी ४७ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून एक नवीन रुग्ण पॉझीटीव्ह आलेला आहे . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही १३८ झाली आहे. आज प्राप्त झालेला १ पॉझीटिव्ह रुग्ण हा लोहारगल्ली , नांदेड भागातील १ रुग्ण ( १ पुरुष वय ३५ वर्षे ) आहे. या रुग्णावर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे . आज दिनांक २८/०५/२०२० रोजी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील २ रुग्ण , एनआरआय यात्री . निवास कोवीड केअर सेंटर येथील १ व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथील ०१ ' अंसे ०४ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . आतापर्यंत १३८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरीत ४३ रुग्णांवर औषध उपचार चालू असून त्यातील २ स्त्री रुग्ण वय ५२ व ५५ वर्षे यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे .
दिनांक २७/०५/२०२० रोजी पाठविण्यात आलेल्या ७३ स्वॅबचा तपासणी अहवाल आज रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होईल व दिनांक २८/०५/२०२० रोजी ११९ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत , त्यांचे अहबाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील . एकूण १३८ रुग्णांपैकी ७ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे व ९० रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . ४३ रुग्णांपैकी ०६ रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे २१ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड ५ येथे ग्रामीण रुग्णालय भोकर येथे १ रुग्ण , ग्रामीण रुग्णालय , माहुर येथे १ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे १ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे ४ रुग्ण असून २ रुग्ण मुंबई येथे संदर्भात करण्यात आले असून इतर सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती याळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन घ्यावे.जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते . असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 28/05/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 3618
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-3346
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1726
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 175
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 51
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3295
• आज घेतलेले नमुने - 119
• एकुण नमुने तपासणी- 3621
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 138
• पैकी निगेटीव्ह - 3132
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 192
• नाकारण्यात आलेले नमुने - 14
• अनिर्णित अहवाल – 141
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 90
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 7
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 137540 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत




No comments:
Post a Comment