नांदेड : नांदेड जिल्ह्यात आज दिनांक ३० मे २०२० रोजी सांयकाळी ०५.०० वाजेपर्यंत कोरोना विषाणू संदर्भात प्राप्त झालेल्या एकूण १३१ अहवालापैकी ११२ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले व नवीन १ रुग्णांचा स्वॅब पॉझीटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १४४ झाली आहे . ग्रामीण रुग्णालय भोकर कोविड केअर सेंटर येथील १ रुग्ण व उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील २ रुग्ण व डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील १ रुग्ण असे एकूण ४ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आतेती आहे . आतापर्यंत १४४ रुग्णांपैकी १०३ रुग्णांना रुग्णालयातून सट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ३३ रुग्णांवर औषधपचार चालू असून त्यातील २ स्त्री रुग्ण ज्यांची वय ५२ व ५५ असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे .
आज प्राप्त झालेला १ पॉझीटीव्ह रुग्ण हा इतवारा भागांतीत ( पुरुप वय वर्ष ३२ असून त्याच्यावर एनआरआय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहे .
दि . ३०/०५/२०२० कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता : सर्वेक्षण १३९१३४, घेतलेले स्वॅब ३८२५, निगेटिव्ह स्वब ३३५०, आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या ०१, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण १४४, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १४८, स्वॅब नाकारण्यात आलेले संख्या १३, मृत्यू संख्या ८, रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली संख्या १०३, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ३३, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या १५२
दिनांक २ ९ / ०५ / २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या ७८ स्वॅबचे तपासणी अहवाल आज रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होईल व दिनांक ३०/०५/२०२० रोजी ७४ स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील . एकूण १४४ रुग्णांपैकी ८ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व १०३ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित ३३ रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ८ रुग्ण , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे एकूण १५ , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे २ रुग्ण , ग्रामीण रुग्णालय माहूर येथे १ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे १ रुग्ण व ग्रामीण रूग्णालय उमरी येथील कोविड केअर सेंटर येथे ४ रुग्ण असून २ रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेले असून उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधपचार सुरु आहेत . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सतर्क करणारे आरोग्य सेतू ऍप सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसिकर यांनी केले.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 30/05/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 3820
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-3550
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1880
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 159
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 62
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3488
• आज घेतलेले नमुने - 74
• एकुण नमुने तपासणी- 3825
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 144
• पैकी निगेटीव्ह - 3350
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 152
• नाकारण्यात आलेले नमुने - 27
• अनिर्णित अहवाल – 148
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 103
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 8
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 139134 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment