महिलांनो सत्यवानाची सावित्री नको ; फुलेंची सावित्री व्हा ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 5, 2020

महिलांनो सत्यवानाची सावित्री नको ; फुलेंची सावित्री व्हा !



             आज वटपौर्णिमा सर्व भारतीय स्त्रियां आपल्याला प्राणवायू देणाऱ्या वटवृक्षाला फेऱ्या घालण्यासाठी अगोदर आठवडा भर तयारी करत असतात. ते पण कोणासाठी तर आपल्या नवऱ्यासाठी. का ? तर म्हणे सात जन्मी हाच नवरा मिळू दे. मला वाटते अहो, त्या नवऱ्याला तर तुम्ही याच जन्मात नको आहात. तर तुम्ही कुठल्या सात जन्माच्या गोष्टी करीत आहात ? का तर तुम्ही त्याच्या काळजी पोटी हे सगळं करत असता. पण ते त्याला ते अजिबात पटत नाही. मग तो कामावरून घरी येते वेळी चार मित्र भेटले कि त्यांची मैफिल चालू होते आणि त्या मैफलीत तू त्याला फोन करून हैराण करत असतेस. त्यामुळे घरी आल्यावर दोघांचे लगेच वाद. या ना त्या कारणाने दोघांमध्ये दररोज भांडणं. अनेक वेळा तू घर सोडून जा तू अमक्या पुरूषासोबत का बोलतेस? तू अमक्या बाईशी का बोलतेस? यावरून सुध्दा वाद. तरी पण तुमच्या प्रेमाखातीर वटपौर्णिमेच्या दिवशी 
मला हाच नवरा हवा सात जन्मी पाहिजे.
            कारण तुमच्या मनामध्ये सुरुवाती पासूनच अनेक प्रकारच्या भाकड कथा भरलेल्या आहेत. मी तर ग्रामीण भागामध्ये अशी कुटूंबे पाहिली आहेत. संध्याकाळी दारूला पैसे नाही दिले तरी पत्नीला जीव जाईपर्यंत मारहाण करायची आणि स्त्रियांनी ती मुकाट्याने सहन करायची. आजकालचा तर जमाना बदलला पण रूढी परंपरा तशाच राहिल्या. आज उच्चशिक्षित स्त्रियां सुध्दा अशा या भाकडकथांवर विश्वास ठेवून आज धावपळीच्या काळात वडाला फेऱ्या मारण्यासाठी न जाता वडाच्या झाडाची फांदी आणूण त्याची पूजा करतात. त्या स्त्रियांना मी सांगेन बायांनो आज आपण जी वडाची पूजा करताय ना ते या सत्यवानाच्या सावित्रीमुळे, नव्हे तर विद्येची देवता पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या मुळे. जर सावित्रीबाई फुले जन्माला आल्या नसत्या तर तुम्ही वर्षानुवर्षे वटपौर्णिमाच साजऱ्या करत बसला असता. कारण भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर तुम्हाला फक्त एक गरजेची वस्तू म्हणून तुमच्याकडे पाहिले जायचं. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले आणि इतर महापुरूषांमुळे तुम्हाला सोन्याचे दिवस आले. पण तुम्ही त्या महापुरूषांना विसरून काल्पनिकते कडे वळला. तुमच्या मंदिर प्रवेशाने देव बाटत होते. वेळोवेळी तुमचा अपमान होत होता. पण नवऱ्याच्या प्रेमासाठी तुम्ही तुमचा अपमान सहन करत पुजाऱ्याला दक्षिणा देऊन तुम्ही मंदिरात गेलात. पण ज्या सावित्रीबाई फुले यांनी तुम्हाला शिक्षण मिळावे म्हणून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. त्या सावित्रीबाई फुलेंना विसरून तुम्ही सत्यवानाच्या सावित्री कडे वळलात. सावित्रीने खरच प्राण मिळवून आणला असता तर माझ्या देशातील जवान कधी शहीद झाले असते का? माझा अन्नदाता फाशी घेऊन मेला असता का? 
            
-सूर्यकांत कांबळे,
- संस्थापक अध्यक्ष,
 स्वराज्य युवा संघटना

1 comment:

  1. Satyavana chya savitri nava varunach Phule chya savitrich naav aahe hai satya kunihi nakaru shakat naahi.sati savitrich aaplyakade aadikalapasun prasiddh aahet. Navboudh samajane aata hindu dharmavar tika karan sodun boudh dharmacha chya tatvancha prachar kel tr bar hoil.pansheel ch kiti percent lok palan kartat yavar hi post lihaavi.fakt hindu chya sanaanvar dola thevaicha aani tikatmak lekh lihaiche hai sodun jar boudh dharmachya shalintecha avalamb kela tar bar hoil.Gautam budhanni sangital aahe "man dukhavan hi suddha ek prakarchi hinsach aahe" mg ka man dukkavata hindu lokanchi?konta dharm palta tumhi lok?hindu tar sodla.chaan kel.pn aata tari hindu cha pichcha soda.boudh dharmala tari nyaai dya. Raja ram mohan roy,jyotiba phule ni Kuprathela virodh kela.pn tumhi tar vatpournima haldi kunku la virodh karta te pn tumach kaahich len den nastana hi?ugich hindu san aahet mhanun.ya prathet ladies enjoy kartat.tyanchyavar kaahi julum nasto.maajhi request aahe hindu lok je kartaat te karu dya.tumchya dharmat je aahe te tumhi kara pn ugach ase lekh lihun hinsa karu naka. Tya peksha Gautam budhanche tatva palanyache prayantna kara aadhi mahit pn karun ghya kai aahet te.tripitak maahit pn nasel an asel tar kadhi vachal nasel.

    ReplyDelete

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News