किनवट : मंगळवारी (ता.10) इयत्ता 12 वीच्या परिक्षेस प्रारंभ होणार असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी केली असून तालुक्यातील 10 केंद्रावर तीन हजार पाचशे पंचेवीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांच्या अध्यक्षतेखाली उप विभागातील किनवट व माहूर तालुक्यातील केंद्र संचालकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर (किनवट) , अभिजीत जगताप (माहूर) , पंचायत समिती , उप विभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे , माहूरचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस , गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने (किनवट) , संतोष शेटकार (माहूर) , विस्तार अधिकारी ( पं) वसंत वाघमारे, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , सहायक परिरक्षक शेषराव पाटील (माहूर) व समशीर खान (किनवट) यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष राहूल कर्डिले , मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली , जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (मा) तथा जिल्हा दक्षता समिती सदस्य सचिव माधव सलगर यांच्या नेतृत्वात यावर्षी कापीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी उचित तयारी केली आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला, किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर व पंचायत समिती किनवटच्या गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार , विस्तार अधिकारी यांचे भरारी पथक जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केले आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर पंचायत , शिक्षण , महसूल , कृषि व बालविकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांचे बैठे पथक परीक्षा संपेपर्यंत ठाण मांडून राहणार आहे. किनवट तालुक्यात 10 परीक्षा केंद्र असून 3502 विद्यार्थी परिक्षेस बसले आहेत. 142 वर्गखोल्यात 3510 ड्यूल डेस्क चीव्यवस्था केली असून प्रत्येक वर्गखोलीवर 123 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. अशी माहिती गट शिक्षणाधिकारी तथा परिरक्षक अनिलकुमार महामुने यांनी दिली.
उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनस्त सर्व ठाणेदारांनी चोख पोलीस बंदोबस्त आखला आहे.




No comments:
Post a Comment