किनवट : मंगळवारी (ता.10) रोजी किनवट इयत्ता 12 वीच्या परिक्षेस कॉपीमुक्त वातावरणात प्रारंभ झाला असून तालुक्यातील 10 केंद्रावर 3 हजार 486 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 384 विद्यार्थी उपस्थित होते ; तर 102 विद्यार्थी गैरहजर राहिलेत. कुठेही गैरप्रकार आढळला नसून प्रशासनाच्या जय्यत पूर्व तयारीने भयमुक्त, कॉपीमुक्त सुरळीतपणे परीक्षा सुरू असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी तथा परिरक्षक अनिलकुमार महामुने यांनी दिली.
सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा सुरू असून तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांचं भरारी पथक परीक्षा केंद्रांना भेटी देत आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष राहूल कर्डिले , मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली , जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (मा) तथा जिल्हा दक्षता समिती सदस्य सचिव माधव सलगर यांच्या नेतृत्वात यावर्षी कापीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी वेब कास्टींग होत आहे. हे यावर्षीच्या परिक्षेचं वैशिष्ट्ये आहे.
प्रत्येक केंद्रावर पंचायत , शिक्षण , महसूल , कृषि व बालविकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांचे बैठे पथक परीक्षा संपेपर्यंत ठाण मांडून होते ते परीक्षा संपेपर्यंत राहणार आहे. केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे व सहायक परिरक्षक समशेर खान हे परीक्षा यशस्वीपणी पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.




No comments:
Post a Comment