किनवट : येथील पोलिस ठाण्यात शनिवारी ( ता. सहा ) दिवंगत डी.टी कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा सामाजिक वारसा जपत त्यांचे सुपूत्र बाळकृष्ण कदम यांनी आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कोरोनायोध्दे पोलिसांना रोगप्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या औषधांचे वाटप करण्यात आले.
दिवंगत कदम गुरुजी यांनी नेहमी सामाजिक कामात रस दाखविलेला होता. वनातील वन्यप्राण्यांना पाण्याची सोय करणे, नागरिकांसाठी बोर मारणे, झाडे लावणे अशा त्यांच्या सामाजिक कार्याचा धागा पकडत कोरोना प्रादुर्भावात कामाच्या तणावामुळे आपल्या आरोग्याची काळजी न घेऊ शकणाऱ्या पोलिसांसाठी आर्सेनिक बम-30 या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी औषधी गोळ्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण कदम यांनी आपल्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून घेतला.
यावेळी बोलतांना आमदार भीमराव केराम म्हणाले की, माझ्या भागातील पोलीस स्टेशन इमारत व पोलिस कर्मचारी निवासस्थान अद्यावत करण्यासाठी मी आजच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना पत्र लिहले असुन नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थानांचे काम लवकर मार्गी लागणार आहे .
यावेळी पोलिस निरिक्षक मारोती थोरात, पोलिस उप निरिक्षक राहूल भोळ, विजयकुमार कांबळे , भाजपातालुकाध्यक्ष संदिप केंद्रे, मारोती भरकड, डॉ. रितेश सुर्यवंशी, शिवाजीराव माने, संतोष मरसकोल्हे, राजेंद्र भातनासे, श्याम मगर, चव्हाण, उपसरपंच बालाजी पावडे, पोलिस कॉन्स्टेबल कोलबुद्धे, पांढरे, गाडेकर, संदूपटलवार, बोंडलवाड, पाटोदो आदी कर्मचारी उपस्थित होते.





No comments:
Post a Comment