18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त; संबंधितांवर गुन्हा दाखल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 11, 2020

18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त; संबंधितांवर गुन्हा दाखल



नांदेड : लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये गोवा गुटखा 30 बोरी अंदाजे 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.

लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र. के. ए. 38- 6482 या वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थाची 10 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी तपासणी केली. यावेळी 1 हजार गोवा गुटखा 30 बोरी जवळपास 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला.  गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील पडसावली (ता. आळंदा) येथील आरोपी रुखमोद्दिन इमाम इमानदार वय वर्षे 28 यांच्या विरुद्ध माळाकोळी पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मा. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास अजीवन तुरुगंवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.  अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, सुनिल जिंतूरकर व नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी केली.  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News