किनवट : कोरोना प्रादुर्भावामुळे मानवी जीवन पटरी वरुन उतरले असुन किमान एक वर्ष तरी सर्व व्यवहार सुरळीत होण्याकरिता लागतील, असा अंदाज आहे. परंतु अशा कठीण काळात एकमेकांना सहकार्य करुन आपणास पुढे जायचे आहे व आलेले संकट परतवुन लावायचे आहे. याच अनुषंगाने मुलांचे शैक्षणिक सत्र अजुन सुरु करण्यास शासनाने परवानगी दिलेली नसतांना देखिल काही शाळांनी मुलांचे प्रवेश सुरु केले असुन प्रवेशांच्या नावावर हजारो लाखो रुपये डोनेशन व वार्षीक फी पालकांकडुन उकळणे चालु आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे पालक हैरान असुन कोरोनाच्या बिकट काळात हे कॄत्य शैक्षणिक संस्था कडून केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाच्या संकट समयी खाजगी शाळांनी पालकांना सहकार्य करावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी दिला आहे.
देशात व राज्यात २१ मार्च पासुन लॉकडाउन घोषित करण्यात आला. तो काळ व त्या नंतर चे दोन महिणे हे विद्यार्थ्यांकरीता अत्यावश्यक असतात. कारण या काळात पाठ्यक्रम पुर्ण करण्यात येतो, विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन व त्यांचे निकाल घोषित करण्यात येतात. परंतु लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द झाल्या. शैक्षणिक नुकसान झाले तथा विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. यामुळे देखिल दुहेरी नुकसान सहन करणा-या पालकांना मागील वर्षीच्या चार महिण्याच्या फिसचे पैसे परत करुन शैक्षणिक संस्थानी दिलासा द्यावा . असेही प्रकार राठोड यांनी नमूद केले आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्राकरीता खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या प्रवेशावेळी डोनेशन, प्रवेश फी माफ करावी कारण वर्षानुवर्षे लाखो रुपये या खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांकडुन कमावले आहेत. त्यांनी अशा संकटाच्या समयी पालकांची साथ द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
ज्या पालकांना खाजगी शाळा व महाविद्यालय तथा इंग्रजी माध्यमाच्या शाळा पैशा करीता त्रास देतील व प्रवेश नाकारतील त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांच्याशी संपर्क साधावा,आम्ही याबाबत पालकांचे समाधान करु असेही त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सदैव नागरीकांच्या सहाय्याकरिता अग्रेसर असुन किनवट माहुर मतदारसंघात माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वात देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम करत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट समयी नागरीकांनी काळजी करु नये संयमाने आलेल्या संकटांना परतवुन लावावे, असे आवाहन प्रकाश राठोड यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment