नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील सहा महिन्याचा एक बालक बरा झाला असून डॉ. पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 4 बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 186 व्यक्तींना ते कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. नांदेड शहरातील सुंदरनगर येथील 23 वर्षाचा एक पुरुष पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 297 एवढी झाली होती परंतु नुकतेच 35 झी टीव्ही महिला रुग्ण नांदेडमध्ये दाखल झाल्याने आता एकूण बाधितांच्या चा आकडा 300 झाला आहे.
जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 48 अहवालापैकी 47 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात 98 बाधितांवर औषधोपचार चालू असून त्यातील त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 व 54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात 98 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 61, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 6 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शुक्रवार 19 जून रोजी 87 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 751,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 604,
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 888,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 1,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 297,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 232,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 91,
मृत्यू संख्या- 13,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 186,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 98,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 87 एवढी संख्या आहे.
नांदेडात नव्याने दाखल झालेल्या तीन बाधितांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. एक 45 वर्षीय महिला हैदराबाद येथून मंडई ईतवारा येथे दाखल झाली आहे. दुसरी महिला बारा वर्षाची पुणे येथून नाथनगर येथे दाखल झाली आहे. तिसरी महिला सोळा वर्षाची पुणे येथून नाथनगर मध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे आता नांदेड एकूण बाधितांची संख्या ही 300 झाली आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ऍप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ऍप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 19/06/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 5604
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 5297
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2860
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 108
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 23
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 5274
• आज घेतलेले नमुने - 90
• एकुण नमुने तपासणी- 5604
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 300 (पैकी ०३ संदर्भीत आलेले आहेत)
• पैकी निगेटीव्ह - 4888
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 87
• नाकारण्यात आलेले नमुने - 91
• अनिर्णित अहवाल – 232
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 186
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 145751 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment