खेडे गावातील अतिसामान्य कुटुंबातील सपना अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत प्रोफेसर पदावर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 1, 2021

खेडे गावातील अतिसामान्य कुटुंबातील सपना अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत प्रोफेसर पदावर

 






           ही गोष्ट आहे जुना धामणगाव येथील सपनाची. शिक्षण हे व्यक्तीचा कायापालट करते एकूणच व्यक्तीचे जीवनमान बदलून टाकू शकते या उक्तीचे हे जिवंत उदाहरण आहे .येथे लिहिण्याचा उद्देश एकच आहे की यातून बोध घेऊन कुणीही व्यक्ती आपली प्रगती साधू शकतो, विशेषतः हा लेख विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. 

         सपना प्रकाश बनसोड ही जुना धामणगाव या खेडे गावातील अतिसामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी. घरची परिस्थिती बेताचीच. परिसरात बहुतेक लोक अशिक्षित. फक्त बाजूला प्राध्यापक दीपक आटे यांचे वास्तव्य. आई वडील अशिक्षितच. सपनाचे वडील भाजीविक्रेते, आई शेतमजूर सपनाचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले, दहावी कोटांबा येथून पूर्ण झाल्यानंतर बारावी सायन्स आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वेतुन पूर्ण केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उच्च विचार सोबतीला होतेच. शिक्षणाचा ध्यास घेऊन सपनाने यवतमाळ येथून B.Pharm चे शिक्षण पूर्ण केले. मग M.Pharm साठी सरकारी कोट्यातून तिची मोहाली (पंजाब) या ठिकाणी निवड झाली.  नागपूर पलीकडे न गेलेल्या आई-वडिलांनी माझा सल्ला घेतला.  मी त्वरित प्रवेश घेण्याचा त्यांना सल्ला दिला. तेथे तिचे सर्व शिक्षण मोफत झाले. माझा पंजाबला जाण्याचा सल्ला तिच्या आई वडिलांनी एका क्षणात मानला याबद्दल मला त्याचे खूप कौतुक वाटले. सपना सुवर्णपदक प्राप्त करून एम. फार्म पास झाली. संस्थेतर्फे हैदराबाद येथे तिचा Ph.D. साठी प्रवेश झाला. Ph.D. ला तिला पंचेचाळीस हजार रुपये महिना स्कॉलरशिप मिळत होती. त्या scholarship मधले तीस हजार रुपये सपना दरमहा वडिलांना जुना धामणगाव येथे पाठवत होती. काही लोक पैसे नाही गरीब आहेत म्हणून शिक्षण घेऊ शकत नाही अशी ओरड करतात त्यांच्यासाठी हे उदाहरण अतिशय महत्त्वाचे आहे. पी.एचडी. होत नाही तोच तिची निवड अमेरिकेतील एका प्रतिष्ठित स्कूल ऑफ मेडिसिन सेंट लुईस वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी प्रोफेसर पदावर झाली. आज भारतीय चलनानुसार साडेचार लाख रुपये महिना प्रमाणे सपनाला वेतन मिळत आहे. गरीबीची परिस्थिती आहे म्हणून शिक्षण टाळणाऱ्यांसाठी सपनाची शिक्षणाची गोष्ट समाजाला प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही.

-राजेश डोंगरे

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News