गरजू अस्थिव्यंग बांधवांनी कृत्रिम अवयव वितरण शिबिराचा लाभ घ्यावा - गट शिक्षणाधिकारी निळकंठ चेटले # 27 जून रोजी किनवटमध्ये शिबीराचे आयोजन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 24, 2026

गरजू अस्थिव्यंग बांधवांनी कृत्रिम अवयव वितरण शिबिराचा लाभ घ्यावा - गट शिक्षणाधिकारी निळकंठ चेटले # 27 जून रोजी किनवटमध्ये शिबीराचे आयोजन

 


किनवट : येथील जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूलमध्ये 27 जून रोजी  हातपाय नसलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त गरजू अस्थिव्यंग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन परिविक्षाधीन उप शिक्षणाधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी निळकंठ चेटले यांनी केले आहे.

     महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद ,  नांदेड यांनी एस. आर, ट्रस्ट, मध्यप्रदेश आणि ALIMCO, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "ऑन द स्पॉट" मोजमाप व तात्काळ वितरणासाठी "अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव वितरण शिबिर" आयोजित केले आहे.
       नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स, साहित्याच्या मोजमाप व तात्काळ वितरणासाठी "ऑन द स्पॉट" शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी  टोंगळ्याच्या खाली व वरती असलेला कृत्रिम पाय, मनगट आणि खुब्यापासून कट झालेला कृत्रिम हात ,पायाचे सिलम (प्लास्टिकचा पट्टा) कॅलिपर्स , दैनंदिन वापरासाठी स्पोर्ट बूट हे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
      हे शिबीर जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल ,  किनवट येथे शनिवारी (ता. 27 जून 2026) सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 वाजेपर्यत आयोजित केले आहे.  दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नांदेडचे सहाय्यक आयुक्त अवधूत गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक प्रदीप कांबळे, महादेव वायकुळे , शेख अन्सार , अंकुश आडेराव व व्यवस्थापकीय अधीक्षक प्रमोद बागवाले हे शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत . तेव्हा वरील प्रकारातील जास्तीत जास्त गरजू अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांनी  आधार कार्ड , रेशन कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र , UDID कार्ड या  कागदपत्रासह या शिबिरास हजर राहून लाभ घ्यावा. असे आवाहन श्री चेटले यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News