नागोराव आनंदा पोपलवार यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 4, 2021

नागोराव आनंदा पोपलवार यांचे निधन

 




उमरखेड : तालुक्यातील बाळदी येथील ज्येष्ठ नागरिक नागोराव आनंदा पोपलवार (वय : 81 वर्षे ) यांचे मंगळवार (दि.04 मे ) रोजी सायंकाळी 05.45 वाजता नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या दोन्हीही किडण्या निकामी झाल्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव बाळदी ता. उमरखेड जि.यवतमाळ येथे बुधवार (दि.05 मे ) रोजी सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

        ते अत्यंत प्रेमळ, मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, पाच मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. आनंदा, मारोती, धम्मपाल, तुकाराम, सत्यपाल आणि अर्चना उत्तम पाटील (टेंभी), शालिनी संजय घुले (नांदेड), करुणा सुरेश वाघमारे ( सिंरजणी), चित्रकला कैलास कावळे (महागाव ) यांचे ते वडील होत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News