महार जातीचे प्रमाणपत्र द्यावे ; महार बटालियनची तहसीलदारांकडे मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 3, 2021

महार जातीचे प्रमाणपत्र द्यावे ; महार बटालियनची तहसीलदारांकडे मागणी




बेला (आदिलाबाद) : अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातून महार जातीचे प्रमाणपत्र तहसीलदारांनी द्यावे, ह्या मागणीचे निवेदन महार बटालियनने मंगळवारी ( दि.03 ) तहसीलदार रामरेड्डी यांच्याकडे सुपूर्द केले.  

           यावेळी महार बटालियनचे नेते तेजराव मस्के बोलतांना म्हणाले की, नोटरीकृत प्रतिज्ञापत्र, दोन सरकारी कर्मचाऱ्यांचे घोषणा पत्र व स्वतःच्या निवेदनासह जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर  ऑनलाईन जात प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. भलेही या प्रक्रियेला 15 ते 30 दिवस लागतील.  अशी अनेक प्रकरणे आहेत की, जिथे शिष्यवृत्ती, नोकऱ्या आणि कल्याणकारी योजना जात प्रमाणपत्र वेळेवर  सादर न केल्याने गमवाव्या लागल्या आहेत.  

         यावेळी महार बटालियनचे नेते गौतम थानके, दुर्वास गावंडे, गजानन खोब्रागडे, भिक्कन निमसरकार, संतोष मानकर, गणेश कांबळे, दीपक कांबळे, सिद्धू, अमूल, आणि इतर  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News