घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 13, 2022

घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना

 


नांदेड (जिमाका)  :  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


मार्गदर्शक सूचना


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी अस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही. कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News