सत्यभामा मधु बावलकर यांचे निधन ; गुरुवारी (ता. 25 ) दुपारी 2.00 वाजता अंत्यसंस्कार होणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, August 25, 2022

सत्यभामा मधु बावलकर यांचे निधन ; गुरुवारी (ता. 25 ) दुपारी 2.00 वाजता अंत्यसंस्कार होणार

 


आदिलाबाद (तेलंगाणा) : येथील पिट्टलवाडा मधील ज्येष्ठ रहिवाशी सत्यभामा मधु बावलकर (वय 65 वर्षे) यांचं हैदाबाद येथील एका रुग्णालयात शस्त्रक्रीया झाल्यानंतर बुधवारी (ता. 24 ) रात्री 8.00 वाजता निधन झालं.

        गुरुवारी (ता. 25 ) दुपारी 2.00 वाजता त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या घराजवळील पिट्टलवाडा येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांचे पश्चात दोन मुलं , दोन मुली , नातवंडं असा मोठा परिवार असून सामाजिक कर्मठ कार्यकर्ते, प्रख्यात गझलकार मधु बावलकर यांच्या त्या पत्नी होत.

        त्यांचे पती मधु बावलकर हे पोस्ट खात्यात कार्यरत असतांना व निवृत्ती नंतरही सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने देशभर त्यांची भ्रमंती असायची. त्यस्थितितही त्यांनी आपल्या लेकरांचं पालन पोषण, शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं. तसेच आदिलाबाद जिल्ह्यात त्यांचे पती विविध  सामाजिक कार्यक्रम घेत असल्याने अनेक कार्यकर्त्यांचा त्यांच्या घरी राबता असायचा. परंतु त्यांची कधीच चिडचिड नसायची. आनंदाने सर्वांच्या भोजनाची व्यवस्था त्या करीत. कार्यकर्त्यांची पत्नी असावी तर कशी ? याचं त्या उत्तम उदाहरण होत्या.

          

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News