थायलंडच्या जागतिक शांतता रॅलीत श्रामणेर होऊन सहभागी झालेले अभियंता भरतकुमार कानिंदे यांचा मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, January 23, 2024

थायलंडच्या जागतिक शांतता रॅलीत श्रामणेर होऊन सहभागी झालेले अभियंता भरतकुमार कानिंदे यांचा मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार

 


                                          
नांदेड : ऋषीपटन श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव-नांदुसा येथे नियोजित श्रामणेर दीक्षाभूमि केंद्राचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अभियंता भरतकुमार कानिंदे हे थायलंड येथे  एक महिना श्रामणेर दीक्षा घेऊन त्यांनी जागतिक शांतता रॅलीत सहभाग घेऊन ते नुकतेच मायदेशी परतल्यानंतर त्यांचा सपत्निक सत्कार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते  करण्यात आला आहे.
    या प्रसंगी प्रामुख्याने भदन्त पय्याबोधी महाथेरो, रमेशदादा सोनाळे,  माधवदादा जमदाडे, कामगार नेते शिंगे, प्रा. साहेबराव इंगोले, अशोक गोडबोले, टी. पी. वाघमारे, मल्हारे, प्रा. लोणे, देविदास भिसे, मिलिंद गायकवाड, भीमराव धनजकर, वसंत वीर, प्रा.सोनाळे ,जनाबाई पोपलवार, सावंत,  अभियंता मुकुंद नरवाडे, विजय थोरात, प्रा. इंगोले, कोडींबा वासाटे आदी मान्यवरांसह नांदेड व  परिसरातील उपासक- उपासिका बहुसंख्येनं उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News