किनवट : संविधान केंद्रित संस्कृतीतील सर्वश्रेष्ठ सण- उत्सव असलेला '75 वा प्रजासत्ताक दिन' राष्ट्रप्रेम प्रकट करणारी गीते, भारत माता की जय, सत्यमेव जय ते, ह्या सर्वश्रेष्ठ घोषणांनी व विविध उपक्रमाच्या आयोजनातून उप विभागीय अधिकारी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कार्तिकेयन एस.(भाप्रसे) यांनी महानायकांच्या प्रतिमा पुजनानंतर राष्ट्रध्वजवंदन केले. राष्ट्रगीत , महाराष्ट्र राज्यगीत झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व सर्वांना तंबाखू मुक्तीची व कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली.
तबला विशारद प्रा. शिवकुमार कोंडे यांच्या साथीने रेणूका देवी स्वरताल संगीत महाविद्यालयाच्या संगीत विशारद प्रा. आम्रपाली वाठोरे , त्यांच्या शिष्या शर्वरी गिरीष पत्की, आदिश्री गिरीष पत्की व श्रीनिधी सुधाकर चाटोरे ह्यांनी राष्ट्रगीत , राज्यगीत व देशभक्ती गीते सादर केली. येथील रत्नीबाई राठोड प्राथमिक शाळेच्या डिजीटल युगाचा देखावा व देशभक्ती गीतावरील लेझीम नृत्याने सर्वांची मने जिंकली. सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनच्या वतीने कराटेचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सरस्वती विद्या मंदीर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती नृत्य सादर केले. इयत्ता दुसरीतील उत्कर्षा मनोहर पाटील हिने इंग्रजीतून भाषण केले.
यावेळी स्वातंत्र्यसेनिकांच्या पत्नी मुक्ताबाई निवृत्ती सावते यांचा गौरव करण्यात आला. नाशिक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शासकीय आदिवासी आश्रम शाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील कबड्डी संघाचा कर्णधार राम प्रसाद भुरके, 17 वर्षीखालील कबड्डी संघाचा कर्णधार लक्ष्मण भुरके , धावण्याच्या 400 मीटर मध्ये रजत व 200 मीटर स्पर्धेत कास्यपक विजेती दिपाली मुरमुरे , लांबउडीत रजत पदक विजेता आकाश गेडाम , क्रीडा व्यवस्थापक सचिन शिंदे यांचा व स्मामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने तायक्वांदो स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या बळीराम पाटील महाविद्यालयातील रोषणी मेश्राम हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवमतदार नोंदणीत उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल पर्यवेक्षक केंद्र प्रमुख रमेश राठोड, यादव देवकते , वंदना स्वामी , चंद्रकला पोले , बीएलओ शेख इब्राहीम शेख मुनीफ , मल्लीकार्जून स्वामी , इम्रानखान करीमखान , नवनाथ कोरनुळे, निता ठाकरे , पंचशिला वाठोरे यांचा आणि राष्ट्रीय मतदार जागृती दिना निमित्त घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत यशवंत ठरलेल्या प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे यांचे सह सरस्वती महाविद्यालयातील , प्रा. डॉ. आनंद भालेराव यांचे सह बळीराम पाटील महाविद्यालयील व राम बुसमवार यांचे सह जि.प.प्रा.शा. बेंदीतांडा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी अमित राठोड, गट शिक्षणधिकारी ज्ञानोबा बने, नायब तहसीलदार अनिता कोलगणे , विकास राठोड, एन. ए. शेख, निवृत्त तहसीलदार उत्तम कागणे , माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान सरदारखान, के. मूर्ती, सामाजिक कार्यकर्ते बाबाराव पाटील, आशाताई कदम, गंगूबाई परेकार, विद्या पाटील आदींसह पत्रकार , नागरिक , शिक्षक , विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते.
तहसील कार्यालय व नगर परिषदेत प्रशासक- मुख्याधिकारी तथा तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांचे हस्ते, पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी अमित राठोड यांचे हस्ते, गट साधन केंद्र येथे गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांचे हस्ते, अंगणवाडी कार्यालयात बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड यांचे हस्ते व विविध कार्यालयात कायालय प्रमुखांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
No comments:
Post a Comment