मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश : नवी मुंबईत जल्लोष! ; स्वागतासाठी जेसीबी सज्ज #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश स्वीकारणार #मुख्यमंत्री वाशीत दाखल. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, January 27, 2024

मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश : नवी मुंबईत जल्लोष! ; स्वागतासाठी जेसीबी सज्ज #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश स्वीकारणार #मुख्यमंत्री वाशीत दाखल.

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे): मनोज जरांगे यांच्या  आंदोलनाला फार मोठे यश प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने मध्यरात्री अध्यादेश पारित करून मराठा आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यामुळे वाशीमध्ये रात्री जल्लोष सुरू झाला आणि आंदोलनाचे रूपांतर विजयी रॅलीत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश स्विकारून  मनोज जरांगे आपले उपोषण सोडणार आहेत. हा मराठा आंदोलकांचा फार मोठा विजय  आहे. छत्रपती शिवाजी चौकात  लाखो मराठा आंदोलक मोठ्या आनंदाने एकत्र झालेले आहेत. आंतरवाली ते मुंबई हा प्रवास खडतर होता ; परंतु आम्ही विजयी होणार याचा आम्हाला विश्वास होता, असे मनोगत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले होते आणि  हा आत्मविश्वास त्यांनी सार्थ करुन दाखवला.

      मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी अंतरावली ते मुंबई या रस्त्यामध्ये अनेक समर्थकांनी जेसीबीने फुले उधळून त्यांचे स्वागत केले होते. एक अनोखा मराठा नेता मनोज जरांगे यांच्या रुपाने आम्हाला मिळाला अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अभय ठाकरे यांनी व्यक्त केली. फुलांची उधळण करून आपल्या नेत्यांना  स्वागत करून रस्ता मोकळा करून दिला जात होता.

       महायुती सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या. अध्यादेश काढण्यात आले. म्हणून मध्यरात्रीच फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली.  मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठा आरक्षणासंदर्भातील राजपत्र मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्याची घोषणा करण्यात आली . यानंतर मनोज जरांगे यांनी मध्यरात्री पत्रकारांशी संवाद साधला.



मराठा बांधवांचा जल्लोष सुरू 

     

     मराठवाड्यात नोंदी सापडल्याने  शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे.  कुणबी नोंदी सापडल्याने प्रमाणपत्र प्राप्त होणार आहेत. प्रमाणपत्रासाठी अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर वाशीमध्ये मराठा आंदोलकांचा मोठा जल्लोष सुरू झालेला आहे. लढा यशस्वी झाल्यानंतर विजयी रॅली काढणार आहेत. आगामी आधिवेशनात कायदा पारित केला जाणार आहे.  अंतरवाली सराटीसह राज्यात आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेणार , 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र मिळणार. त्याआधार सग्यासोयऱ्यांनासुद्धा प्रमाणपत्र काढता येणार आहेत. मनोज जरांगे यांचे औक्षण करून जल्लोष केला जात आहे.






मनोज जरांगे पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी उदय नरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


उदय नरे,

सुर्यकिरण बी-१२, माँडेल टाऊन,

सात बंगला,

अंधेरी ( पश्चिम)

मुंबई 4000 58 


प्रति,

माननीय मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य,

मंत्रालय 

मुंबई 


माननीय महोदय,

सप्रेम नमस्कार 


27 जानेवारी 2024 हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदला जाईल. गेली अनेक वर्षे मराठा आंदोलनकर्ते आपल्या न्याय्य मागणीसाठी झटत होते. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून खऱ्या अर्थाने आपण मराठा समाजाला आरक्षण दिले याबद्दल कोटी - कोटी मराठा समाजाच्यावतीने आपले हार्दिक अभिनंदन! 


मुख्यमंत्री म्हणून आपण मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळवून देणार असं म्हटले होते . कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार आहोत. त्यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. सगळ्या गोष्टी मी इथं सांगत नाही. परंतु, मराठा समाजाने विश्वास ठेवावा की आपलं जे आरक्षण काही मागच्या सरकारच्या चुकांमुळे गेलेलं आहे. ते कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला देणार ! असा विश्वास तुम्ही शपथेवर दिला होता व आज शनिवार दिनांक 27 जानेवारी 24 नवी मुंबईतील वाशी येथील मराठा आंदोलनकर्ते ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत होते त्या ठिकाणी स्वतः आपल्या मंत्री मंडळातील सहकाऱ्यांसह उपस्थीत राहिले व इतिहास घडविला व तसा अध्यादेश सुपुर्द केला.या ऐतिहासिक घटनेची नोंद महाराष्ट्रातील केवळ मराठाच नाहीतर सर्व समाजाची जनता घेईल असा मला विश्वास वाटतो. 

मराठा आंदोलनकर्त्यांचे  नेते मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ न घेता अहोरात्र परिश्रम करून आपल्या मराठा बांधवांसह मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. फार मोठा जन आशीर्वाद मनोज जरांगे पाटील यांना लाभला. एक आगळा वेगळा मराठा नेता महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. अशा नेत्यांची गरज राज्यातील जनतेला आहे. असे नेतृत्व विधान परिषदेत घणाघात करण्यासाठी आवश्यक आहे. विधान परिषदेवर अनेक सर्व सामान्य व्यक्तींना नियुक्त केले जाते हे आपल्याला ज्ञातच असेल. परंतु आपल्या कारकिर्दीत एक अनोखे नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या रुपाने लाभले आहे. मनोज जरांगे पाटील यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात यावी ही नम्र विनंती. 



उदय नरे 

9892755311 

अंधेरी, मुंबई




No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News