राजकारणातील एकच दादा अजित दादा : राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवारांकडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, February 7, 2024

राजकारणातील एकच दादा अजित दादा : राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवारांकडे

 


मुंबई (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र) : राज्यात निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्वपूर्ण निर्णय दिला. अजित पवार यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे दिल्याने शरद पवारांना फार मोठा धक्का बसला आहे. आपल्याकडे 40 आमदार व जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा असल्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली. हा निकाल आमच्या विरोधात गेला असता तर आम्ही नक्कीच सुप्रीम कोर्टात दाद मागितली असती. मी विनम्रपणे निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतोय अशी प्रतिक्रिया अजित दादा पवार यांनी दिली. 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षाचा धनुष्यबाणचिन्हासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठोपाठ आता शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली अजित पवार सर 40 आमदार शरद पवार यांना सोडून गेले त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच आहे असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटच्या  आधारावर आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे असे शरद पवार गटातून सांगण्यात आले. पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभर अजित दादांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन फटाके आणि गुलाल उधळून  जल्लोष साजरा केला. 




मुळ पक्ष कोणाचा यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. गेल्या ६ महिन्यात यासंदर्भात १० सुनावणी झाल्यानंतर अखेर आयोगाने हा निर्णय दिला. सुप्रिया सुळे यांच्या मते वडीलांनाच घराबाहेर काढले असे संतप्त प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी देऊन आपला संताप व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विरोधात एक अदृश्य शक्ति कार्यरत आहे त्याचाच हा परीणाम आहे. मराठी माणसाचा पक्ष फोडण्याचे कार्य केंद्राकडून केले जात आहे. आम्ही सुप्रिम कोर्टात न्याय मागणार आहोत. 


निवडणूक आयोगाचा हा निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो. आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत! असे अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या पोस्टच्या खाली त्यांनी अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा उल्लेख केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News