पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर शरसंधान #उध्दव साहेब ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, February 10, 2024

पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर शरसंधान #उध्दव साहेब ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी  महाराष्ट्रातील बिघडत्या राजकीय परिस्थितीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्राचे उत्तर प्रदेश व बिहार होत असल्याचं दोन घटनांवरून दिसून येत आहे. राज्यातील जनता असुरक्षित आहेत. गुंडगिरी फोफावत चालली आहे. राज्यात पोलीस स्थानकामध्ये झालेला गोळीबार आणि दहिसर मधील फेसबुक लाईव्ह मध्ये एका गुंडाकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची झालेली हत्या या संदर्भात मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी उद्धव साहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषद पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले. 


महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? असा प्रश्न विचारावासा वाटत आहे.  एका व्यक्तीची हत्या होत असताना त्याची बरोबरी श्वानासोबत केली जात आहे, अशा शब्दात शिवसेना  पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. 


उद्धव ठाकरे उवाच! 

महाराष्ट्रात सरकारच्या आशिर्वादाने आज राज्यात गुंडगिरी चालू आहे. हे सरकारमधील गँगवॉर आहे. गुंडांचे मुख्यमंत्र्यांसमवेत फोटो आणि त्यांना दिलं जाणारं संरक्षण हा चिंतेचा विषय आहे. आमचा कार्यकर्ता अभिषेक घोसाळकर याची हत्या झाली. ज्याने हत्या केली असं सांगितलं जातं, तो गुंड होता, नंतर त्याने आत्महत्या केली. सूडभावना टोकाची भावना असेल असं आपण मानू, पण त्याने आत्महत्या का केली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशनमधील व्हिडिओ समोर आलाय, मॉरीस सोबतचा व्हिडिओ फेसबुक लाईव्हवर होता, पण अभिषेकला गोळ्या झाडताना दिसतंय पण कोणी गोळ्या घातल्या, याचा व्हिडिओ अजून समोर आलेला नाही. त्या मॉरीसने बॉडीगार्ड नेमला होता, अभिषेकवर गोळ्या कोणी चालवल्या, दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिलेली का? हा प्रश्न उपस्थित होतो, राज्य सरकार या घटनेची चौकशी कशी करणार असा संशय व्यक्त केला जात आहे. 


राज्यातील गुंडाना सन्मानित केले जाते आधीचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जास्तच कर्तव्यदक्ष होते, त्यांच्यासोबतच त्या गुंडाच्या (मॉरीस) सत्काराचा फोटो समोर आला आहे. गणपती विसर्जनावेळी एका आमदाराने गोळीबार केला, त्याला क्लीन चिट दिली. दहिसरजवळच्या आमदाराच्या मुलाने एका तरुणाचं अपहरण केलं होतं, ठाण्यात एका तरुणीच्या अंगावर गाडी घालणारा भाजप कार्यकर्ता होता, अशी उदाहरणंच ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितली.


 पुण्यात पत्रकार निखिल वागळे,, असीम सरोदे यांच्यावर हल्ला झाला. देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक बोललो, फडतूस बोललो, पण आता माझ्याकडे शब्द उरले नाहीत. त्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का असं वाटतं. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्यमंत्री स्वतःच गुंडाला पोसत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

तपास यंत्रणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात येऊन आमच्या नेत्यांना धमकावत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार रविंद्र वायकर यांना त्रास देऊन पक्षांतर करण्यासाठी दबाव येत आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

पोलिसांवर दबाव आहे. राज्यातील जनता मतदानाद्वारे  निवडणूकीत आपला राग व्यक्त करेल असे भाष्य पत्रकार परिषद उध्दव साहेब ठाकरे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News