असा रंगला चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम : लोणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे गावकऱ्याने केले कौतूक ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, February 10, 2024

असा रंगला चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम : लोणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे गावकऱ्याने केले कौतूक !

 किनवट  : कमठाला केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर, भीमराव कुरसंगे, तंटामुक्त समितीचे गोपीनाथ पाटील, योगेश राघू, विजय पावडे, अनंता बादड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य बक्षीसे देण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदविधर शिक्षक अंकुश राऊत यांनी, प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी, तर आभार विद्या श्रीमेवार ह्यांनी केले. तंत्रस्नेही शिक्षक राहुल तामगाडगे यांनी  तांत्रीक बाबी सांभाळली तर एकनाथ बादड आणि ग्रामशिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, युवक मंडळांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

           कार्यक्रमाच्या प्रारंभी शुभ दिन आयो रे..या गीताने झाला. त्यानंतर कु. मंत्रा गुंजकर हिचे मी 'जिजाऊ बोलतोय ' सम्रदा बादड हिचे 'मी सावित्री बोलतोय ' साईनाथ बादड याचे 'मी शिवाजी बोलतोय.. 'मारुती मेडलकर याचे 'मी आंबेडकर बोलतोय ' प्रतिक गुंजकर याचे 'मी राजे संभाजी बोलतोय.. ' अशा विविध एकपात्रीचे सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

           स्कूल चले हम, आमच्या पप्पांनी गणपती आणला, बम बम बोले..या गीतावर इयत्ता पहिली दुसरीचे विद्यार्थी मारुती, गणराज, आर्यन, आरव, आरोही, वैष्णवी, प्रीती, त्रिशा, अनन्या हिने सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर गुलाबी शरारा, लावणी रिमिक्सवर तनु, रुद्रा, मारुती, स्वरा, श्रेया, आरती, काजल, श्रध्दा हिने अप्रतिम नृत्य सादर केले. श्रेया, मंत्रा, पायल, लक्ष्मी, राधा, प्रतिमा हिने मायभूमी जन्मभूमी, आदिवासी नृत्य, कोळी रिमिक्स या गीतावर बहारदार नृत्य करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. माझी सखी बायको मेली आणि लिलिपुट या विनोदी गाण्यावर रोहन, प्रतीक, योगेश, ऋषिकेश, शिवम, निशांत, मारुती, ऋतिक, वीर, साईनाथ, अभिषेक, स्वराज यांनी नृत्य करून प्रेक्षकात हशा पिकविला.

         तनु बादड हिचा तेलगु डान्स, मंत्रा गुंजकर हिचा शिवकन्या, पायल वाघमारे हिचा भीमकन्या, रूपाली पवार हिचा देश रंगीला, स्वरा कदम हिचा नऊवारी साडी, वैष्णवी बादड हिचा केळेवाली, मारुती मेंडलकर याचे काठी न घोंगड आणि पूर्वी धुर्वे हिचे वाजले की बारा या लावणीने प्रेक्षकांनी वाहवा केली. अनेकांनी शैक्षणिक साहित्य बक्षीसं देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News