किनवट : शिवाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती लक्ष्मीबाई संटन्ना कटकमवार (वय 90 वर्षे ) यांचे शनिवारी (ता. 02 मार्च 2024 रोजी ) रात्री 8. 50 वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्या अत्यंत मायाळू व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. ईश्वरिय ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या माताजी म्हणून त्यांनी निरपेक्षपणे कार्य केले आहे. त्यामुळे त्या सर्व परिचित होत्या.
शिवाजीनगर येथील संथागार वृद्धाश्रमाजवळील त्यांच्या निवासस्थानापासून रविवारी (ता. 03 मार्च 2024 ) सकाळी 10.30 वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असन पैनगंगातिरावरील कैलाशधाम मोक्षभुमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व दोन मुली , नातू , पणतू असा मोठा परिवार असून वन विकास महामंडळ महाराष्ट्राचे निवृत्व विभागीय वन व्यवस्थापक दिवंगत नारायणराव कटकमवार , कृषि विभागातील संभू कटकमवार व गोदावरी अर्बण बँकेचे संचालक तथा खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे स्नेही प्रा. सुरेश कटकमवार यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment