आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था महाराष्ट्रच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 30, 2024

आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था महाराष्ट्रच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण

 


नांदेड : जिल्ह्यातील कंधार येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्यच्या तालुकास्तरीय व  तालुक्यातील अनेक शाखा, कार्यकारिणीची निवड करून मान्यवरांच्या हस्ते एका विशेष सोहळ्यात  मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले.

          याप्रसंगी  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर ,  मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे,  सचिव व्यंकटराव जाधव, प्रभाकरराव पुयड, जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील, शिवाजीराव पांगरेकर,  भगवान पा. रहाटीकर, बालाजी पवार, धोंडीराम राजे, बिलोली तालुकाध्यक्ष राजेश्वर पाटील, मारोती वडजे, नागेश पाटिल कपाळे, त्रिमुख पा. यडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तालुकाध्यक्ष प्रभाकर पा. पवळे यांनी प्रस्ताविक केले.

         याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांनी संस्थेचे ध्येय धोरण सांगतांना असे म्हणाले की ,  संतांचे वाड्यमय घरोघरी गेले पाहिजे ,  सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ज्ञानेश्वरी जावी म्हणुन गत सहा वर्षापासुन घरोघरी मोफत ग्रंथ देऊन  आपल्या सर्वांच्या सहकार्याने ज्ञानेश्वरी पारायण करीत आहे.  जेवढ्या ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत तेवढे ग्रंथ पारायण यावर्षी करण्याचा संकल्प आहे. तसेच पंढरपुर येथे आपल्या हक्काची  धर्मशाळा स्थापन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

         

संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील आपल्या मनोगतात असे म्हणाले की ,  गावातील दुषित वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी ' बिघडत असलेली नवतरूणांची पिढी व्यसनापासुन परावृत व्हावी, यासाठीच " गाव तिथे आम्ही वारकरी परिवाराची " शाखा स्थापन कर त आहोत. यात सर्वांनी सहभागी व्हावे. 

          कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी   उपाध्यक्ष विश्वनाथ इंगळे, सचिव कैलास पानचावरे, कोषाध्यक्ष दिनानाथ सांगळे, सहसचिव ज्ञानेश्वर झंपलवाड, शाखा अध्यक्ष केशव पवळे, वसंत कदम, शिवदास पवळे, पवन पवळे, विष्णुदास पुय्यड, देवानंद पवळे, प्रभाकर पवळे, सहदेव कदम आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News