किनवट : आदिवासी विकास विभागाच्या नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश योजनेतून प्रविष्ठ बहुताशी अदिवासी विद्यार्थी असलेल्या तालुक्यातील कोठारी (चि) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेचा इयत्ता १० वीचा ९८.१८ टक्के निकाल लागला असून येथील आकांक्षा गोविंदराव सोनटक्के (९५.२० टक्के) ही शाळेतून प्रथम, स्नेहा दत्ता राठोड (९५.००%) ही व्दितीय, दृष्टी विनोद कदम ( ९३.८०% ) ही तृतीय आली आहे.
विशेष बाब म्हणजे एकूण ५५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक आणि २६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोकुंदा व्दारा संचलित मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळा कोठारी (चि) येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशवंतात आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळेत प्रवेश या योजनेत प्रविष्ठ झालेले बहुतांशी आदिवासी विद्यार्थी आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके, सचिव शुभांगीताई ठमके, प्राचार्य, शिक्षकवृंद व सर्व कर्मचारी यांच्यासह सर्व स्तरातून यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment