शैक्षणिक वर्षारंभ प्रसंगी सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करावा -गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 14, 2024

शैक्षणिक वर्षारंभ प्रसंगी सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करावा -गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने


 

किनवट : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात शनिवारी (दि.१५ जून) व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक ०१/०७/२०२४ रोजी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करावे, असे राज्याचे प्र.शिक्षण संचालक (प्राथमिक) नंदकुमार बेडसे यांनी पत्राद्वारे कळविले असल्याचे गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी सांगितले.

        त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे मुख्याध्यापकांनी कार्यवाही करावी : शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधी मध्ये करण्यात यावा. निदर्शनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत. नजीकच्या परिसरातील दगडखाणी, वीटभट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने बाजारपेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे. शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी शिक्षण विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे/शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन/प्रबोधन करावे. विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, सदस्य, पालक व शिक्षक यांचेशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्ती साठी उपाय योजना, सेतू अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे. शाळा प्रवेशोत्सावाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ इत्यादी यांचे सहकार्य घेण्यात यावे. शाळा सुरु होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभातफेरी आयोजन, विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत, मोफत पुस्तक वितरण, मोफत गणवेश इत्यादी कार्यक्रम आयोजित करावेत. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ) यांचे सहकार्य घ्यावे. दिनांक १५ जून, २०२४ रोजी राज्यात शाळा प्रारंभ होत आहेत. हा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करावा. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधून या दिवशी मिष्ठान्न भोजन द्यावे.


AMSद्वारे १००%शिक्षकांनी QR कोडद्वारे उपस्थिती दि.१५जूनपासूनच नोंदवावी...* शनिवारी सकाळी १०-३०वा. किती शिक्षकांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदविली,तो अहवाल आम्ही  स्वतः पाहू . 

२१जूनला जागतिक योग दिन सक्रिय साजरा करावा.

५/८शिष्यवृत्ती,नवोदय-nmms, सैनिक शाळा इ.तयारी/नियोजन करून काम सुरू करावे. वृक्षारोपण -मोठी उंच झाडे घेऊन, लावून ती जगतील हे पहावे. इयत्ता १ली ला ३०सप्टेंबर२०२४पर्यंत मराठी वाचन येण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.[कुठल्याही माध्यमातून-सचित्र बालमित्र,अ अननसाचं,रचनावाद, डिजिटल, पाठ्यपुस्तक इ.पद्धतीने एक वा अनेक]

'ऑपरेशन गगनभरारी' अंतर्गत लोकवाटा,शिक्षक वाटा,२%सेस निधी, ग्रामपंचायत २०%निधी, वस्तू -सुविधा-नगद-रुपाने गोळा करण्यासाठी प्रयत्न करावा.

-मीनल करनवाल ,

मुख्य कार्यकारी अधिकारी ,

जि.प. नांदेड

 

सर्व मुख्याध्यापकांनी खालील सूचना अवगत कराव्यात : १५ जून २०२४ला शाळा सुरू होतील. शाळा वेळ- सकाळी-सोम ते शुक्र १०ते४-१५वा. शनिवारी १०ते दुपारी *सर्वजण शाळा वेळ काटेकोर पाळतील.  पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके वाटप करण्यात यावीत... पाठ्यपुस्तके कमी पडल्यास आपणास  गेल्या वर्षी दिलेली पुस्तके परत घेण्याच्या सूचना होत्या त्या जुन्या पुस्तक सुद्धा यावर्षी वापरायचे आहे तरीही कमी पडत असतील तर लेखी स्वरूपात मा.केंप्रंना कळवावे...मा.केंप्रंनी पाठ्यपुस्तके कमी/अधिक अहवाल तत्काळ पं.स.ला लेखी देऊन पोच घ्यावी.पहिल्या दिवशी १००%विद्यार्थी हजर राहतील, हे पहावे... पहिल्या दिवशीच अध्यापन सुरू करावे. इयत्ता १ली प्रवेश फॉर्म एप्रिलमध्ये भरलेले असतीलच... पहिल्या दिवशीच प्रवेश फॉर्म १००%भरलेले दिसावेत...पहिल्या दिवसापासून शापोआ शिजवावा.  अध्ययन स्तर निश्चित करून मराठी वाचनात कच्च्या मुलांना दररोज १५-२०मिनिटे वेळ देऊन मराठी वाचनासाठी प्रयत्न करावा. १००%मुलांचे आधार असावे.आधार व्हॅलिड असावे. गणवेश, पाठ्यपुस्तके,जोडेमोजे, शिष्यवृत्ती इ.लाभ फक्त आधार व्हॅलिड असणाऱ्यांनाच मिळणार आहेत,याची लेखी कल्पना पालकांना द्यावी. वार्षिक नियोजन, तासिका नियोजन,शिक्षक वर्ग वाटप,घंटीचे वेळापत्रक,शापोआ मेनू,शाव्यस,परिवहन समिती त्याचबरोबर माहिती अधिकार फलक इ.दर्शनी भागात लावावे.१००%शिक्षकांनी पहिल्या दिवशी हजर रहावे...१००%विद्यार्थी गुणवत्तेसाठी भविष्य वेधी शिक्षण पद्धती वापरून -निवडणूक, अहवाल, उपक्रम -या काळातही शिक्षण चालू राहील, यासाठी नियोजन करावे.

-डॉ. सविता बिरगे ,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) , जि.प. नांदेड



नवभारत साक्षर असाक्षर  नोंदणी साठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर दोन बैठका झाल्या तरीही फारसा प्रतिसाद नाही तर तात्काळ व साक्षर नोंदणी ऑनलाईन करावी .

-दिलीप बनसोडे,

शिक्षणाधिकारी (योजना) , जि.प. नांदेड


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News