मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक आज पार पडली - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 26, 2024

मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक आज पार पडली

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले. मुंबई मतदारसंघांमध्ये एकूण पाच उमेदवारांची कसोटी लागणार आहे  अदाजे 15500 पेक्षा अधीक मतदार असलेल्या या शिक्षक मतदार संघात तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते .


मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे हे रिंगणात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक ही चुरशीची होणार आहे.



पदवीधर मतदार संघामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे एडव्होकेट  अनिल परब आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण शेलार यांच्या मध्ये सरळ सामना होणार आहे. गेली अनेक वर्ष पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आणि यावर्षी तो आपल्याकडे खेचण्याचा चंग बांधला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कंबर कसली होती. शिक्षक मतदारसंघांमध्ये सातत्याने 18 वर्ष प्रतिनिधीत्व केलेले आमदार कपिल पाटील यांनी आपली उमेदवारी आपले सहकारी सुभाष मोरे यांना दिलेली आहे. शिक्षक भरतीचे अनेक कार्यकर्ते आज सकाळपासून आपल्या नेमून दिलेल्या बुथवर कार्यरत होते श्री मंगेश नलावडे, शारदा गायकवाड, हेमंत फडतरे पौर्णिमा परळकर ही शिक्षक भारतीची टीम मुंबई उपनगरात कार्यरत होते तर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख प्रचार यंत्रणेत सहभागी झाले होते. युवा सेना विभाग अधिकारी रमेश वांजळे, उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड, एडव्होकेट अनिल परब यांचे विश्वासू नेते संजय कदम, यलप्पा कुशालकर, यांची टीम अनिल परब व जन. मो. अभ्यंकर यांच्यासाठी सकाळ पासून कार्यरत होती. या भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम आपल्या कार्यकर्त्यांसह सकाळ पासूनच मतदार केंदावर तळ ठोकून होते. मतपत्रिका मतपेटीत बंद झालेल्या आहेत.  एक जुलैला मतपेटीतील निकाल जाहीर होईल. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

मतदान आकडेवारी



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News