#आदिवासी भागात ठमके दामपत्यांचं शैक्षणिक कार्य वाखणण्याजोगे -आ. भीमराव केराम # विद्यार्थ्यांनी अंगी शिस्त, सदाचार अभ्यासाची जिद्द व बिकट परिस्थितीला सामोरे जायचं हे अंगीकारलं तरच ध्येय साध्य होईल -कावली मेघना,भाप्रसे # किनवटच्या एमआयटीतील नीट मध्ये प्राविण्य प्राप्तांसह 10 वी व 12 वीतील यशवंतांचा गौरव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Thursday, June 27, 2024

#आदिवासी भागात ठमके दामपत्यांचं शैक्षणिक कार्य वाखणण्याजोगे -आ. भीमराव केराम # विद्यार्थ्यांनी अंगी शिस्त, सदाचार अभ्यासाची जिद्द व बिकट परिस्थितीला सामोरे जायचं हे अंगीकारलं तरच ध्येय साध्य होईल -कावली मेघना,भाप्रसे # किनवटच्या एमआयटीतील नीट मध्ये प्राविण्य प्राप्तांसह 10 वी व 12 वीतील यशवंतांचा गौरव

किनवट : येथील एमआयटीत अभ्यासकरून नीट परिक्षेत 595 गुण घेणाऱ्या सुयश प्रशांत ठमके यांचा , त्यांची आई प्राचार्या शुभांगाताई ठमके व वडिल अभि. प्रशांत ठमके यांचा सत्कार करतांना आमदार भीमराव केराम , सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कावली मेघना , भाप्रसे व मान्यवर 

किनवट : आदिवासी , डोगरी तालुक्यात ठमके दाम्पत्यांनी केलेल्या उत्तुंग शैक्षणिक कार्यामुळेच येथील उपेक्षित विद्यार्थी आज डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे मोक्याच्या व माराच्या जागा पटकावित आहेत. अशा यशवंतांचा गौरव होणे हे इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, हा सत्कार समारंभ आयोजिल्याबद्दल संस्थेचे , मार्गदर्शक शिक्षक , यशवंत व त्यांचे पालक यांचे कौतुक करतो, असे गौरोद्गावर आमदार भीमराव केराम यांनी अध्यक्षीय समारोप करतांना काढले.

       विद्यार्थ्यांनी अंगी शिस्त, सदाचार अभ्यास करण्याची जिद्द व बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याचे गुण अंगीकारले तरच त्यांना आपले ध्येय साध्य करता येईल, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प धिकारी कावली मेघना , भाप्रसे यांनी केले.

        येथील एन.के. गार्डनमध्ये मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा, व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोकुंदा व्दारा संचलित मातोश्री कमलताई ठमके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा (किनवट) यांच्या वतीने संयुक्त  राजर्षी शाहू महाराज जयंती  सामाजिक न्याय दिन निमित्त आयोजित  वैद्यकीय प्रवेशास पात्र , 10 वी व 12 वी परीक्षेतील गुणवंतांच्या व  त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

     यावेळी पोलिस निरिक्षक  सुनिल बिर्ला ,  सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र शेळके , प्रेमसिंग आडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी,  प्रदीप नाईक, दत्तात्रय डोंगशेनवार,  माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,  केंद्र प्रमुख ग. नु . जाधव, आमदारांचे जनसंपर्क अधिकारी  संतोष मरसकोल्हे , वार्ताहर  ऍड.मिलिंद सर्पे, गोकुळ भवरे, किरण ठाकरे, दत्ता जायभाये आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

      प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करण्यात आले.  यानंतर संस्थेचे सचिव  अभि. प्रशांत ठमके, संस्थेच्या कोषाध्यक्ष तथा प्राचार्य शुभांगीताई ठमके यांनी मान्यवरांचे शाल- पुष्पहार देवून स्वागत केले. प्राचार्य अंबादास जुनगरे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा उंचावत जाणारा आलेख मांडला.

     संस्थेच्या सलंग्न असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,गोकुंदा,  मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मेडीयम स्कुल कोठारी (चि), महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोटी, मातोश्री कमलताई ठमके माध्यमिक विद्यालय सुभाषनगर, किनवट, मातोश्री कमलताई ठमके उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा या मधील 10 वी व 12 वी परीक्षेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणारे गुणवंत, वैद्यकिय प्रवेशास पात्र यशवंत व  त्यांच्या पालकांचा सत्कार शाल, पुष्पहार व ग्रंथभेट देवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

     महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा सेमी इंग्रजी माध्यमात एकूण 241 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी शंभर टक्के आहे. त्यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे तब्बल 73 विद्यार्थी आहे व 75 % पेक्षा जास्त गुण घेणारे 133 विद्यार्थी आहे. गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 गुण प्राप्त केलेली आहे व एका विद्यार्थिनीने सामाजिक शास्त्रामध्ये शंभर गुण घेतलेले आहेत.

     मराठी माध्यमात 165 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 163 उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी 98.78 आहे.90% पेक्षा जास्त गुण घेणारे 7 विद्यार्थी आहेत. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला परीक्षा, विज्ञान प्रदर्शनी व खेळ यामध्ये  विद्यार्थी सहभागी होत असतात यामध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच NMMS परीक्षेत तीन विद्यार्थी पात्र ठरले आहे व पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दहा व आठ विद्यार्थी अनुक्रमे गुणवंत ठरले आहेत.

     चित्रकला परीक्षेत इंटरमीडिएट मध्ये 130 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्याची टक्केवारी 96.15 आहे एलिमेंटरी या परीक्षेमध्ये 334 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 298 विद्यार्थी उत्तीर्ण झाले टक्केवारी 89.22 आहे.

     उच्च माध्यमिक विभागात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत 422 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 418 विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी 99.05 आहे. कला विभागात 199 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 176 विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला शाखेचा निकाल 88.44 आहे प्राणी विज्ञान व तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र व गणित विषयात शंभर पैकी 100 गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत. तसेच वैद्यकीय प्रवेशास अनेक विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. आनंद राम नरवाडे हा विद्यार्थी आयआयटी गुवाहाटी येथे प्रवेशासाठी पात्र झाला आहे.

     आज प्रदूषणाचे भूत सगळ्यांच्याच मानगुटीवर बसलेला आहेत त्यालाच पर्याय म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी रामानंद अनिल शिरभाते याने एटनॉमस मोबाईल चार्जिग स्टेशन फॉर इलेक्ट्रिकल वेहिकल्स या प्रकल्पाचे राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सादरीकरण केले.


विशेष बाब म्हणजे भरमसाठ खर्च करून मोठया शहरात न जाता देशभर चर्चिल्या जाणाऱ्या नीट परिक्षेच्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमिवर संस्थेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स गोकुंदा (किनवट) या आदिवासी, डोंगरी भागातील एकमेव इन्स्टिट्यूट मधून नीट परीक्षेत अगदी कमी कालावधीत विद्याथ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. 


      मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल गोकुंदा यामध्ये दहावीला 55 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 54 विद्याधर्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी 98.43 अशी आहे.

         मातोश्री कमलताई उमके उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीला एकूण 180 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 179 उत्तीर्ण झाले. त्यामधील नामांकित शाळेत असलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले नामांकित शाळेत चा निकाल शंभर टक्के आहे याच कॉलेजचा विद्यार्थी सुयश प्रशांत ठमके हा 92.67% गुण घेऊन केवळ कॉलेजमधूनच नाही तर माहूर आणि किनवट या दोन्ही तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.तसेच उद्यानविद्या या विषयात त्याने २०० पैकी २०० गुण प्राप्त केले आहे.

       संस्थेअंतर्गत चालविल्या जाणारी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी येथील दहावीचा निकाल 94.02 टक्के असा आहे. बारावी विज्ञान शाखेचा निकाल 95.83टक्के आहे. व कला शाखेचा निकाल 90% आहे. तसेच मातोश्री कमलताई ठमके विद्यालय सुभाष नगर शाळेचा निकाल यावर्षी 100% लागला आहे.

     

विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत मांडतांना सुयश प्रशांत ठमके आपल्या यशाचे गमक सांगतांना असे म्हणाले की , परीक्षेला आंनदी मनाने सामोरे गेले पाहिजे व कष्ट, जिद्द आणि परिश्रम ही त्रिसुत्री आपल्या जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यानी बाळगावी, माझ्या यशाचे श्रेय मी अध्यापक वर्ग व आई-वडीलानां समर्पित करतो.

 

     पर्यवेक्षक प्रा. संतोषसिंह बैसठाकूर यांनी सुत्रसंचालन केले.  प्रज्ञा पाटील यांनीआभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या समारंभास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थीनी, परिसरातील नागरीक व विविध वृत्तपत्रांचे वातीहर उपस्थित होते.No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News