"घरापासून शाळेपर्यंत दररोज ये-जा करण्याची थांबली आता पायपीट , सवित्रीच्या लेकींनी मानव विकासच्या मोफत सायकलीने धरली शाळेची वाट" # म.ज्यो. फुले विद्यालयात मानव विकास कार्यक्रमातून 261 मुलींना सायकली - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 30, 2024

"घरापासून शाळेपर्यंत दररोज ये-जा करण्याची थांबली आता पायपीट , सवित्रीच्या लेकींनी मानव विकासच्या मोफत सायकलीने धरली शाळेची वाट" # म.ज्यो. फुले विद्यालयात मानव विकास कार्यक्रमातून 261 मुलींना सायकली

 



किनवट : " घरापासून शाळेपर्यंत दररोज ये-जा करण्याची थांबली आता  पायपीट , सवित्रीच्या लेकींनी मानव विकासच्या मोफत  सायकलीने धरली शाळेची वाट " अशीच प्रचिती आदिम तालुक्यातील गुणवत्तेचं ज्ञानपीठ असलेल्या  गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आली.

      पुढील वर्ग  व वाहतुकीची साधनं नसल्याने सातवीनंतर शाळा सोडण्याचं मुलींचं जास्त प्रमाण ग्रामीण भागात दिसून यायचं. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक कुटुंबातील पालक आपल्या मुलींसाठी वाहतूक सुविधा किंवा सायकल खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते त्यामुळे शाळेत मुलींची मोठी गळती होते. ही गळती थांबवण्यासाठी सरकारने मुलींना 5 किमीच्या आत घर ते  शाळा ये-जा करण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलींना मोफत सायकल वाटप योजना सुरू केली आहे. त्यामुळे अनेक मुलींना शाळेत ये-जा करण्यास सायकल उपलब्ध होत आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून शिक्षण घेण्यात मुलींची सक्षम संख्याही वाढत आहे.



        जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल , शिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (प्रा) डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता  गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील 261 मुलींना सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत.  सायकली खरेदीनंतर हस्तांतरण व मुलींचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन शाळेत नुकतेच करण्यात आले .



     याप्रसंगी या ज्ञानपीठाची संस्था मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडीचे सचिव अभि. प्रशांत ठमके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नयाकॅम्प केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख ग. नु. जाधव , केंद्रिय मुख्याध्यापक रवि नेम्माणीवार , मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे , 25 तेलगू चित्रपटाचे दिग्दर्शक तथा एम.के.टी. इंग्लिश स्कूल, कोठारी (चि)चे प्राचार्य एस.व्ही. रमनाराव , कृष्णानंद इंफ्रास्ट्रक्चर, नागपूरचे व्यवस्थापक अक्रमभाई , प्रकल्प व्यवस्थापक श्यामराव डोंगरे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 



       यावेळी सेवानिवृतीबद्दल व दोन्हीही लेकरं शास्त्रज्ञ झाल्याबद्दल गौतम दामोदर यांचा सत्कार करण्यात आला. नरेंद्र कानिंदे  यांनी सुत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर कदम  यांनी आभार मानले.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य तथा मुख्याध्यापक अंबादास जुनगरे, उपप्राचार्य राधेश्याम जाधव, उप मुख्याध्यापक प्रमोद मुनेश्वर, पर्यवेक्षक संतोष ठाकूर, रघुनाथ इंगळे, किशोर डांगे, सुभाष सुर्यवंशी आदींसह  शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी  यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News