मुंबईचा गड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राखला - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 1, 2024

मुंबईचा गड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राखला

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार एडव्होकेट अनिल परब हे 26000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले त्यांनी आपले भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार किरण शेलार यांचा दणदणीत पराभव केला. शिक्षक मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत होणार होती असे बोलले जात होते परंतु प्रत्यक्षात मात्र उद्धव बाळासाहेब  ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे उमेदवार श्री. सुभाष मोरे यांच्यात अटीतटीचा सामना झाला या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवाराचा 198 मताने विजय झाला. 

मुंबईत झालेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विजयाने शिवसेनेत जोश व उल्हास जाणवत होता. पुन्हा एकदा मुंबई आमच्या ताब्यात असे अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार हे उच्चशिक्षित असतात आणि उच्चशिक्षित लोक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहेत असे प्रतिपादन अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News