नांदेड व परभणी जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा केंद्रबिंदू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Wednesday, July 10, 2024

नांदेड व परभणी जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा केंद्रबिंदूनांदेड : आज बुधवारी (ता.10 जुलै 2024 ) नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. 

         भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. 

        नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News