तासगाव (सांगली) : भारत देशातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटविणाऱ्या प्रतिभाशाली मान्यवरांचा " सतरावे अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलना " च्या पार्श्वभूमीवर " आयकॉन ऑफ नेशन " या राष्ट्रीय पुरस्काराने रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातील सांस्कृतिक पुणे नगरीत येथे नुकताच संपन्न झाला. जम्मू राजघरण्याच्या वंशज राणी डॉ. सुहासिनी सुदन आणि पद्मश्री पुरस्कार विजेता डॉ. विजयकुमार शहा , यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विविध बुक ऑफ रेकॉर्ड धारक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विविध पुरस्काराने सन्मानित, प्रसिद्ध कवी जीवनसंघर्षकार फेम नवनाथ आनंदा रणखांबे यांना आयकॉन ऑफ नेशन या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने पुणे -पिपरी येथील आचार्य आत्रे रंगमंच येथे सन्मानित करण्यात आले.
अंगभूत अद्भुत बुद्धिमत्ता व प्रतिभा धारण करून विविध क्षेत्रात गुणवत्ता व प्राविण्य सिद्ध केल्याबद्दल निवडपात्र पुरस्कारार्थी यांना रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ( आरटीबीआर ) मध्ये समाविष्ठ करीत आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्रमाणपत्र , स्मृतीचिन्ह , गोल्ड-मेडल आणि मेम्बरशिप बहाल करून गौरविण्यात आले. नवनाथ आनंदा रणखांबे हे गौरगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथील ग्रामीण भागातले असून साहित्य क्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन संघर्ष आणि प्रेम उठाव ही पुस्तके मराठी साहित्य विश्वात गाजत आहेत. मराठी साहित्य विश्व आणि आंबेडकरी साहित्य चळवळीत ते आघाडीवर आहेत. साहित्य आणि व्याख्याने यातून ते समाजप्रबोधन करीत असतात. विविध साहित्य सहकार सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक संस्थेच्या उपक्रमात ते सहभागी असतात. विविध क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहेत.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. कौशिक गायकवाड, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक आणि वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्सचे संस्थापक - मुख्य संपादक , जगप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. क्रांती महाजन , राजामाता जिजाऊ यांच्या घराण्याचे वंशज शिवाजी राजे जाधव , तंजावर घराण्याचे वंशज विजयसिंह राजे भोसले , भारत सरकारच्या G-20 चे डायरेक्टर तथा रूडकी आयआयटी चे रजिस्ट्रार संजीव जैन्थ , भारत सरकारच्या एनवायकेएस चे मेघालय मणिपूर नागालँड चे संचालक अतुल निकम , गोवा व महाराष्ट्र राज्याचे संचालक यशवंत मानखेडकर , कॅनडाचे निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. गुरतेज सिंग ब्रार , सीआयडी ऑफिसर आरिफा मुल्ला , समाजसेवक यशवंत कुर्वे , चीफ एडज्यूकेटर ज्युरी डॉ. एस. देवेंद्र, स्वागताध्यक्ष संतोष बारणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment