खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन व सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल -तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 3, 2024

खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन व सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल -तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर

 

किनवट : तालुका क्रीडा संकुल येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून रूजू झालेल्या याच तालुक्याच्या भूमिकन्या शिवकांता देशमुखे यांचा सत्कार करतांना तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर (डावीकडून ) उत्तम कानिंदे , गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने , केंद्र प्रमुख ग.नु. जाधव, तालुका क्रीडा संयोजक संदीप यशीमोड

किनवट : विद्यार्थी असू देत की पालक स्वतःसह कुठलीही वयोमर्यादा न ठेवता क्रीडा शिक्षकांनी आपल्यातील खेळाडू जागवून प्रत्येकातील आवडीचा  कुठलाही मैदानी खेळ जपावा, ज्यामुळे तुमचा खेळ होईल, व्यायाम होईल,  ताण-तणावाचे व्यवस्थापन होईल एकंदरीत सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल, असे प्रतिपादन तहसीलदार तथा तालुका क्रीडा समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले.

        येथील तालुका क्रीडा संकुलात तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक व खेळाडूंचा ऑनलाईन फॉर्म भरणे बाबत प्रशिक्षणाचा अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. यावेळी गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने , नव्यानेच रुजू झालेल्या याच तालुक्याच्या भूमिकन्या तालुका क्रीडा अधिकारी शिवकांता देशमुख, जिल्हा कोच आकाश भवरे , केंद्रप्रमुख ग. नु. जाधव मंचावर उपस्थित होते.

            पुढे बोलतांना डॉ. चौंडेकर  म्हणाल्या की , खेळाने आरोग्य चांगलं राहतं , मेहनत करण्याची वृत्ती वाढते , शिस्त रुजते. आज मोबाईल स्क्रीनचं मुलांसह मोठ्यांनाही वेड लागलं आहे. यापासून आधी पालकांनी दूर व्हावं व मुलांनाही दूर ठेवावं. आजकालच्या भयावह स्थितीत मुला मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत व विद्यटनवादी शक्तीशी सामोरं जाण्याचं त्यांच्यात धाडस निर्माण करावं, असेही त्या म्हणाल्या.

              उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तालुका क्रीडा संयोजक राष्ट्रीय कोच संदीप यशीमोड यांनी आभार मानले. यावेळी आपले विचार मांडतांना गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने म्हणाले की , खेळामुळे आरोग्य तंदुरुस्त राहतं. खेळातून करिअर करण्याची संधी आहे. नव्या खेळासह आपल्या जुन्या पारंपरिक मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करू नये. या आदिवासी तालुक्याचा कबड्डी हा खेळ आहे. मी सुद्धा या खेळाचा राष्ट्रीय खेळाडू होतो. तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी स्वतःला झोकून देऊन काम करावं. जास्तीत जास्त  सराव घ्यावा अन् आपल्या तालुक्यातील खेळाडू हे राज्य , राष्ट्रीय व त्याहीपुढे कसे चमकतील यासाठी मेहनत घ्यावी , असेही ते म्हणाले.

          तदनंतर जिल्हा कोच आकाश भवरे यांनी खेळाडूंचे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याविषयी प्रशिक्षण दिले. भारताकडून निवड होऊन दक्षिण कोरिया येथून धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या ज्ञानेशला खेळासाठी प्रोत्साहन देणारे त्याचे वडील बालाजी चेरले यांचा, आपल्या मुलासह इतर  दोघांना सैनिक स्कूल मध्ये पात्र करण्यासाठी कठोर अभ्यास घेणारे  राहूल तामगाडगे यांचा व याज तातुक्याची भूमिकन्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स, खेळ कोठ्यातून निवड झालेल्या राज्य क्रीडा मार्गदर्शक यांची किनवटच्या प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शिवकांता देशमुखे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व शाळेतील क्रीडा प्रेमी शिक्षक उपस्थित होते.

        जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी , तालुका क्रीडा संयोजक , तालुका क्रीडा संकुलचे कर्मचारी राजू मेलडे , मारुती यशिमोड व आतिश तामगाडगे यांनी बैठक व प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News