*धर्माबाद येथे पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न* *विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने परिश्रम केल्यास यशाला सहज गवसणी घालता येते- कवळे गुरूजी* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, August 9, 2024

*धर्माबाद येथे पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न* *विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने परिश्रम केल्यास यशाला सहज गवसणी घालता येते- कवळे गुरूजी*



धर्माबाद (गंगाधर वाघमारे) : येथील माहेश्वरी भवनात पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने आयोजीत भव्य जिल्हा स्तरीय गुरू गौरव, गुणवंत विद्यार्थी व स्कूल कीट वाटप सोहळा थाटात संपन्न झाला. 

        कार्यक्रमाच्या  नायगांव मतदारसंघाचे शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना असे  म्हणाले की, शिक्षण शेत्रात प्रगती करून यशाच्या उच्च शिखरावर पोहचण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी परिश्रम करावे. यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासोबतच विद्यार्थांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असल्यास यशाला सहज गवसणी घालता येते. पत्रकार संरक्षण समितिने समाजिक जाणीव लक्षात घेता विद्यार्थांना प्रेरणा व प्रोत्साहित करणारा घेतलेला कार्यक्रम विद्यार्थांच्या भावी वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणदायी ठरेल असे मतही त्यांनी यावेळी मांडले. 

       पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने 10 वी -12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गुरू गौरव, पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, आदर्श उद्योजक पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान कऱण्यात आला. 

     यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हा सचिव शशिकांत गाडे, आशिष कुष्णुरकर, महेश शिंदे (नांदेड ), शिक्षण विस्तार अधिकारी जाधव बी. डी., केंद्र प्रमुख बाळापूर कमलाकर , एन. जी, शिंपाळे , एस. ए, बाने , पी. आई गोणारकर , गट साधन केंद्राचे बोपटे मनोहर, वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार जे. के जोंधळे, पत्रकार संजय कदम, गणपत कात्रे, आर. जे. गायकवाड, राजू शिरामाने, एम. मुरलीधर, दीपक पाटील चोळखेकर, अशोक वडजे, पी. जी.कोटूरवार, नागनाथ माळगे, पोतन्ना लखमावाड, आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

   या प्रसंगी २०२४ या वर्षाचा शोध पत्रकारिता पुरस्कार चंद्रभीम हौजेकर यांना देऊन गौरविण्यात आले. तसेच लता राजू चौकेवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देउन सन्मानीत करण्यात आले. यासोबतच आदर्श प्रशासक पुरस्कार  राहुल ममदापूरकर, यांना देण्यात आला. 

     यावेळी जे. के.जोंधळे, बसापुरे सर, जाधव बी डी, संजय कदम, संगीता पाटील,औसाजी जाधव, टी.जी तुरे सर,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबवून गरजू गरीब होतकरू विद्यार्थ्यांना २०० स्कूल किट वाटप करण्यात आले. 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर शेषराव येलमे यांनी केले. सूत्रसंचलन पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांनी केले ; तर म. मुबशीर यांनी संपूर्ण उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संरक्षण समिति चे पदाधिकारी कृष्णा जाजेवार, संजय झगडे,गजानन मुडेवार, गणेश पंदुलवार, फिरोज कुरेशी, लालू उशलवार, दत्ता सज्जन, आदींनी परिश्रम घेतले.



पत्रकार संरक्षण समितीचा सामाजिक उपक्रम अभिमानास्पद -महेंद्र गायकवाड* 


*पत्रकार संरक्षण समिती हि संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय, हक्का लढा देत असून सामाजिक उपक्रमात हि पत्रकार संरक्षण समिती अग्रेसर आहे. धर्माबाद तालुका पत्रकार संरक्षण समितीचा हा सामाजिक उपक्रम अभिमानास्पद आहे.असे मत यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमासमोर व्यक्त केले


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News