किनवट : तालुक्यातील जलधारा केंद्रातील नंदगाव तांडा येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून परसबागेचे निर्मिती करण्यात आली.
प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना अर्थात शालेय पोषण आहार योजनेसाठी लागणारा भाजीपाला मिळावा या हेतूने व विद्यार्थ्यांना श्रमदानाचे व विविध पालेभाज्या ,फळभाज्या इत्यादींची माहिती व्हावी या उद्देशाने मुख्याध्यापक लक्ष्मण नलाबले व त्यांचे सहाय्यक शिक्षक प्रवीण अंबालकर, विजयकुमार काळे, प्रवीण बावस्कर व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आज श्रमदान करून परसबागेची निर्मिती करण्यात आली. तसेच याप्रसंगी स्वयंपाकी निर्मलाबाई गणपत जाधव व मदतनीस सुमनबाई यांनी पण परसबागेसाठी श्रम घेतले.




No comments:
Post a Comment