*नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा* *रेल्वे प्रशासनाकडून लवकरच ना हरकत प्रमाणपत्र मिळणार* -केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांना दिले आश्वासन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 11, 2024

*नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा* *रेल्वे प्रशासनाकडून लवकरच ना हरकत प्रमाणपत्र मिळणार* -केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांना दिले आश्वासन

 

खासदार रविंद्र वायकर


 मंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गेली अनेक वर्ष रखडलेल्या जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे स्टेशन लागत असलेल्या तसेच धोकाद्यक म्हणून घोषित झालेल्या नवलकर मार्केटच्या पुनर्वसनाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल असे, आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांना दिले.

जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या मुंबई महागर पालिकेच्या जागेवर १९६४ नवलकर मार्केट सुरु करण्यात आले. हे मार्केट बांधून  ६८ वर्ष झाल्याने या मार्केटची इमारत धोकादायक झाली आहे. मुंबई महानगर पालिकेने २०१५ मध्ये या मार्केटला धोकादायक म्हणून घोषित करीत नोटीसही दिली आहे. या मार्केटचा पुनर्विकास करण्यासाठी खासदार वायकर यांनी संबंधीत अधिकाऱ्या समवेत अनेक बैठका घेतल्या. परंतु मार्केटची जागा रेल्वे लाईनला लागून असल्याने रेल्वे प्रशासनाची परवानगी न मिळाल्याने पुनर्विकासाचे काम रखडले आहे. नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी नवलकर मार्केटच्या पुर्नार्विकासासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र रेल्वे कडून देण्यात यावे असे निवेदन दिले. 

या निवेदनात त्यांनी याप्रश्नी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुंबई महानगर पालिका तसेच विभागीय रेल्वे अधिकारी यांची संयुक्त बैठेकही झाली. या बैठकीत रेल्वेने बी.एम.सीला सर्व आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगीतली. ती सर्व कागदपत्रे बी.एम.सी ने रेल्वे अधिकारी यांना दिली. परंतु रेल्वेची अद्याप ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने पुनर्विकासाचे काम रखडले असल्याची बाब वायकर यांनी रेल्वे मंत्री यांच्या निदर्शनास आणली. खासदार वायकर यांनी निवेदन दिल्यानंतर रेल्वे मंत्री यांनी लवकर ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News