विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान : जिल्ह्यातील शाळांची तपासणी सुरू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 12, 2024

विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान : जिल्ह्यातील शाळांची तपासणी सुरू

 


नांदेड : शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांतर्गत शिक्षण अधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याकडून ऑगस्ट महिन्यात शाळांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना तसेच शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन तपासणी करणे चालू झाले आहे.


     अध्ययन निष्पत्तीनुसार विद्यार्थी गुणवत्तेच्या कोणत्या स्तरावर आहेत? गणवेशाची उपलब्धता आहे का? विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करणे याबाबत प्रत्यक्ष काय स्थिती आहे? पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग होतो का? शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती किती आहे, आनंददायी शनिवार उपक्रमाची अंमलबजावणी कशी होते? यासह इतर सोयी-सुविधा, विविध योजनांची व उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून दि. १ ते ३१ ऑगस्टया कालावधीत 'विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान' अंतर्गत संकलित करावयाची आहे.

     डायटचे प्राचार्य, शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना, उप शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी मनपा, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्याकडून जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी सोमवार व शुक्रवार वगळता इतर दिवस शाळांना भेटी द्याव्यात, तसेच सरल पोर्टलवरून केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी/प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी दिल्यानंतर किंवा निरीक्षण केल्यानंतर त्या संदर्भातील अहवाल लॉगिनमधून दररोज अद्ययावत करणे गरजेचे आहे. सर्व अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शाळा तपासण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी  डॉ. सविता बिरगे यांनी केले आहे.


या बाबींची तपासणी करण्यात येत आहे


• गणवेशाची उपलब्धता

• प्रधानमंत्री पोषणशक्त्ती योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा / परसबाग विकास स्थिती / स्वयंपाकगृह उपलब्धता.

• स्काउट-गाइड प्रशिक्षण व तासाचे आयोजन.

• विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या

कराराची अंमलबजावणी.

• वर्गखोल्यांची स्थिती.

• स्वच्छतागृहाची उपलब्धता,

• स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी.

• अध्ययन व अध्यापन साहित्याची उपलब्धता व वापर.

• शाळांमधील इंटरनेट सुविधा.

• दप्तराचे ओझे कमी करण्याच्या

उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिती.

• पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभाव उपयोग.

• विद्यार्थी उपस्थित व आधार नोंदणी.

• आनंददायी शनिवार अंमलबजावणी,

• शाळांची वेळ ठरवण्यात बाबतची स्थिती.

• विद्यार्थी गुणवत्ता स्तर इत्यादी 


विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांतर्गत पहिल्या वीस दिवसांत प्रत्यक्ष शाळांना भेट देणे, त्यानंतर पुढील सहा दिवसांत आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा उपाययोजना करणे तसेच उर्वरित चार दिवसांमध्ये अंमलबजावणी झाली किवा नाही याची खात्री करणे, शाळांना सुधारणा करण्याची देणार संधी देणे अशा पद्धतीने या अभियानाची कार्यदिशा ठरवण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News