पा.रंजीत दिग्दर्शित आणि अभिनेता चियान विक्रम यांच्या सुरेख अभिनयाने नटलेला "थंगलान" हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात भगवान बुद्धाच्या विचारांना मानणाऱ्या आणि त्या बुद्धाच्या विचारांचं संरक्षण करणाऱ्या नागनिकाचा प्रभाव कसा होता ? हे इतिहासाच्या खोलात जाऊन सत्य बाहेर काढणारा चित्रपट कसा ठरलेला आहे. हे समजण्यासाठी थंगलान पहावाच लागेल. याविषयीची हेमंत शारदा यांनी 'काही निरिक्षणे ' येथे देत आहोत. -संपादक
काही निरिक्षणे :
१. जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या धनाला गुप्तधन असे म्हणतात. हे गुप्तधन प्रामुख्याने सोन्याच्या रूपात आढळून येते आणि त्या गुप्तधनावर कोणता तरी नाग त्याची राखण करत असतो, अशी गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत; परंतु या मागचा खरा इतिहास असा आहे की, त्या सोन्याचे रक्षण करणारा नाग हा कोणी साप नसून इथले मूल नागवंशीय लोक आहेत.
२. या नागवंशीय लोकांचा प्रमुख ही एक महिला दाखविलेली आहे. याचाच अर्थ असा की नागवंशीय लोक मातृसत्ताक पद्धतीने आपले जीवन व्यतीत करत होते.
३. जम्बूद्विपावरील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संघर्ष हा बुद्धवाद आणि ब्राह्मणवाद यांच्यातला आहे. आताच्या भारतीय व्यवस्थेत सांस्कृतिक संघर्ष हा मुस्लिम विरुद्ध हिंदू असा दाखविल्या जात असला तरीही तो मूळ संघर्ष बौद्ध आणि सनातन ब्राह्मण धर्म यांचे विरोधातला आहे.
४. इथल्या व्यवस्थेमध्ये बुद्ध विचार आणि बुद्ध संस्कृती संपवण्याचे काम ब्राह्मणांनी केलेले आहे. हे काम त्यांना एकट्यांना करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी हे काम क्षत्रियामार्फत करवून घेतले आहे. जात व्यवस्था सुद्धा इथल्या मातीत अशाच पद्धतीने रुजवली गेली आहे.
५. कथेचा नायक हा स्वाभिमान आणि सन्मानाच्या मार्गाने जातो. हा इथल्या मूळ नायकाचा स्वभाव आहे. त्यामुळे भारताचा इतिहासा नेहमीच रक्तरंजित राहिलेला आहे.
६. थंगलान सिनेमात महिलांच्या आणि पुरुषांच्या शरीरावर विविध आकृती आणि चिन्हे दाखवलेली आहेत. त्यामधून इथल्या इतिहासाचे दाखले मिळतात. एका स्त्रीच्या उजव्या दंडावर पिंपळाचे पान कोरलेले आहे जे बौद्ध संस्कृतीची खूण आहे. त्यातून बौद्ध संस्कृती इथल्या मूळ लोकांनी आपल्या विविध कलामधून जिवंत ठेवल्याचे उदाहरण पहावयास मिळते.
७. इथल्या मूळ लोकांना गुलाम बनून त्यांची विविध जातीत विभागणी करून ब्राह्मण आणि क्षत्रीयवर्गांनी त्यांच्याकडून आपले काम करून घेतले; परंतु इथल्या मूळ लोकांना पोटाचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे त्यांनी आपला इतिहास विसरून शत्रूंना मदत केली. ही मदत करण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडे उत्पादनाचे साधन नव्हते आणि जे थोडे उत्पादनाचे साधन होते त्यावर गावातील सावकाराची मालकी होती. याच कारणाने त्यांना गुलामी स्वीकारणे भाग पडले.
८. सिनेमात आरती ही नागवंशी तंगलानला आपला इतिहास वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते. खरंतर आरती ही त्याच्यासाठी प्रेरणा आहे आणि त्याचे मूळ अस्तित्व त्याला दाखवून देण्यासाठी ती मार्गदर्शक ठरते.
९. थंगलानच्या मुलाचे नाव असोका असे आहे. हा अशोक विहिरीतून बुद्धाच्या मूर्तीचे तोंड बाहेर काढतो आणि जमीनीत असलेली बुद्ध मूर्ती शोधून त्याला ते तोंड जोडतो. पुन्हा बुद्ध या मातीवर उभा करतो. जमीनीत गाडलेला बुद्ध पुन्हा बाहेर काढतो.
१०. नागवंशीय परंपरा आपला इतिहास जिवंत ठेवून बुद्ध विचाराचे रक्षण करते आणि तोच संघर्ष सदर सिनेमात पाहायला मिळतो.
११. ऐतिहासिक संदर्भ सिनेमात वारंवार पाहायला मिळतात.
१२. आरतीचे पोट चिरून जेव्हा तिचे रक्त इथल्या जमिनीवर सांडते. तेव्हाच सोने मिळते. याचा लक्ष्यार्थ असा आहे की, नागवंशी यांची अमानुष हत्या केल्यानंतरच या जमिनीतील सोने विरोधकांना मिळाले. नागवंशीय हे इथल्या सोन्याचे आणि विचारांचे रक्षक म्हणून उभे राहतात.
-हेमंत शारदा
Hemant Sharda Dinkar Sawale
पा.रंजीत दिग्दर्शित आणि अभिनेता चियान विक्रम यांच्या सुरेख अभिनयाने नटलेला हा सिनेमा इतिहासाच्या खोलात जाऊन सत्य बाहेर काढणारा ठरलेला आहे.
भारताचा इतिहास हा सिंधू संस्कृतीच्या सभ्यतेमध्ये दडलेला आहे. ही सिंधू संस्कृती नंतर नाग लोकांची संस्कृती बनलेली होती. या नाग लोकांचा देश म्हणजे भारत देश आहे आणि या भारताला बुद्धाच्या विचारांचा खजिना लाभलेला आहे. नाग लोकांच्या या देशांमध्ये सिंधू संस्कृती पासून ते तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धा पर्यंत 27 बुद्ध होऊन गेले आणि या परंपरेतील शेवटचे 28 वे बुद्ध म्हणजे सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध आहेत. यांच्या विचारांचा भारताच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर प्रभाव पडलेला आहे. या बुद्धाच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या, त्याला संरक्षित करणाऱ्या त्या काळात स्त्रिया होत्या. या स्त्रियांना नागणिका म्हणत असत. बुद्धांना नाग लोकांनी जिवंत ठेवलेला आहे. या भारत देशाचे मूळ मालक नागवंशीय लोक आहेत.
पा. रणजीत दिग्दर्शित थंगलान चित्रपट हा भगवान बुद्धाच्या विचारांना मानणाऱ्या आणि त्या बुद्धाच्या विचारांचे संरक्षण करणाऱ्या नागनिकाचा प्रभाव कसा होता हा या चित्रपटाचा मुख्य भाग आहे. ही नागणिका बुद्धाचं कसं संरक्षण करते हे या चित्रपटात आवर्जून प्रमुख रूपात दाखवण्यात आलं आहे.
ब्राह्मण पुरोहित भगवान बुद्धाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी त्या काळातील क्षत्रिय समजल्या जाणाऱ्या लोकांचा वापर करून बुद्धाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतात हे या चित्रपटात स्पष्ट दाखवण्यात आलं आहे. याचाच अर्थ बुद्धांची विचारधारा नष्ट करण्यासाठी ब्राह्मणी विचारधारा काम करत आहे आणि या दोघांमध्ये लढाई चालू आहे हे डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य आणि इतिहास आपल्याला आठवला पाहिजे.
सोन्याचा खजिना शोधण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजेच बुद्धांच्या विचारांचा खजिना आहे. सोनं म्हणजेच बुद्धांचे विचार जतन करण्यासाठी नागणिका कशा पद्धतीने ते वाचविण्यासाठी प्रयत्न करते हे यातून दाखविण्यात आलेले आहे.
भारताच्या इतिहासात स्त्रिया ह्या रक्षण करणाऱ्या महानायिका आहेत. म्हणूनच भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये महाकाली, तुळजाभवानी, जगदंबा, अशा विविध देव्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सर्व भारताच्या रक्षण करणाऱ्या महानाईका त्या काळातल्या महाराण्या होत्या.
परंतु ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामगिरीत अडकल्यानंतर आणि ब्राह्मणांच्या हातात इथली व्यवस्था आल्यानंतर स्त्रियांना गुलाम आणि दास बनवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. ग्रंथ आणि पुराणाच्या माध्यमातून स्त्रियांना गुलाम बनवण्यात आलं आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास,लढवय्या इतिहास गडप करण्यात आला.
Thangalan हा चित्रपट पाहायचा आणि समजून घ्यायचा असेल तर भारताच्या सिंधू संस्कृती पासून ते तथागत भगवान बुद्ध, सम्राट चक्रवर्ती अशोक यांच्या पर्यंतचा आणि आजपर्यंतचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावा लागेल तेव्हाच हा चित्रपट आपल्याला समजू शकतो.
थंगलान हा २०२४ चा भारतीय तमिळ-भाषेतील ॲक्शन ॲडव्हेंचर चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन पा. रंजित यांनी केले आहे, ज्यांनी तमिळ प्रभा आणि अझागिया पेरियावन यांच्यासोबत पटकथा लिहिली आहे. स्टुडिओ ग्रीन आणि नीलम प्रॉडक्शन अंतर्गत के.ई. ज्ञानवेल राजा यांनी याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात विक्रम यांच्यासोबत पार्वती थिरुवुथू, मालविका मोहनन, डॅनियल कॅलटागीरोन, पशुपती आणि हरी कृष्णन यांच्या पाच भूमिका आहेत. चित्रपटाची अधिकृतपणे डिसेंबर 2021 मध्ये चियान 61 या तात्पुरत्या शीर्षकाखाली घोषणा करण्यात आली होती, कारण हा मुख्य अभिनेता म्हणून विक्रमचा 61 वा चित्रपट आहे आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अधिकृत शीर्षकाची घोषणा करण्यात आली होती. त्याच महिन्यात मुख्य छायाचित्रण सुरू झाले. हे तुरळकपणे अनेक पायांमध्ये शूट केले गेले आणि जुलै 2023 च्या सुरुवातीला गुंडाळले गेले. चित्रीकरणाच्या ठिकाणी चेन्नई, आंध्र प्रदेश, मदुराई आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. या चित्रपटाला जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी संगीत दिले आहे, छायांकन ए. किशोर कुमार यांनी केले आहे आणि संकलन सेल्वा आरके यांनी केले आहे. थंगालन हे 15 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या बरोबरीने, मानक, 3D आणि EPIQ फॉरमॅटमध्ये जगभरात प्रसिद्ध झाले.
चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, ज्यांनी मुख्य कलाकारांच्या कामगिरीचे (विशेषत: विक्रम, पार्वती थिरुवोथू आणि डॅनियल कॅलटागीरोन) आणि GV प्रकाश कुमारच्या पार्श्वभूमीचे गुणगान केले, परंतु ऐतिहासिक अयोग्यता, दृश्य प्रभाव, पटकथा आणि लेखन यावर टीका केली. तरीही तो अखेरीस बॉक्स ऑफिस बॉम्ब म्हणून उदयास आला .
No comments:
Post a Comment