सत्कर्म
चांगलं करावं कर्म
तोच आपुला धर्म
न दयावा घाव वर्म
त्यातच साठलंय मर्म
जाणावं दुःखीतांचे दुःख
गोड ठेवून मुख
दुसऱ्याच होतंय भलं
त्यात मानावं सुख.
बघावी जीव सृष्टी
सु ठेवावी दृष्टी
भरून दयावी चाष्टी
असेल जो कष्टी.
करावा दानधर्म
जसं ज्याचं कर्म
तसं फळ मिळे
सांगतो आपला धर्म.
दीन दुःखी अश्रित
दिसले हात पसरीत
भरावी त्यांची ओंजळ
धन धान्य मिश्रित.©️®️
वृद्धाश्रम
नको दाऊ पोरा
जरी थकलंय शरीर
नको देऊस खीर
फक्त असूदे शीर.
लाभेल पुण्य तुला
नको बांधूस झुला
ओसरीत दे आसरा
नको वृद्धाश्रम मुला.
मिळेल मान तुला
आजारपणात कर देखरेख
हिच कुटुंब मेख
तुला म्हणतील शेख.
सांगतो तुलाच मुला
फेड पांग माझे
सांगेल मी नातवाला
फेडेल उपकार तुझे.
करावं तसं मिळेल
तुला तेव्हा कळेल
हिच संपत्ती उरेल
कीर्ती आपलीच पसरेल.©️®️
-प्रदीप पाटील
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव पिन 425108
मोबाईल. 9922239055




No comments:
Post a Comment