किनवट / पुणे : पुणे येथे रविवारी (ता.२९ सप्टेंबर) आयोजिलेल्या राज्यातील शिक्षकांसाठीच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास यशवंत शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणेचे संचालक राहूल रेखावार (भाप्रसे) यांनी केल आहे.
महाराष्ट्र राज्यशालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३० यांच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत तालुका, जिल्हा व राज्य या प्रत्येक स्तरावर प्रत्येकी ६ गटांमधून एकूण २८ विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक स्तरासाठी ८४ बक्षिसे (प्रथम, द्वितीय, तृतीय) निर्धारित होती. सदर सर्व स्तराचे मूल्यमापन कामकाज पूर्ण करण्यात आले असून शासन मान्यतेने राज्यस्तरावरील निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ६ गटांमधून एकूण २८ विषयांसाठी एकूण ८४ बक्षिसांचे (प्रथम, द्वितीय, तृतीय) वितरण करण्यासाठी दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी ठीक १०.०० वा. महात्मा फुले सभागृह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.







No comments:
Post a Comment