महागाव (यवतमाळ) : तालुक्यातील महागाव (पोलिस स्टेशन ) येथील ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपली कारकीर्द गाजवलेल्या वेणूताई हरिभाऊ भवरे (वय ६९ वर्षे) यांचे धम्मचक्र प्रवर्तन दिनी शनिवारी (ता१२) सायंकाळी ६.२० वाजता अल्प आजाराने निधन झाले. नांदेड येथील रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसापासून उपचार सुरू होते.
महागाव येथील मोक्षधामात रविवारी सकाळी ११ वाजता वेणूताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक हरिभाऊ उर्फ हरीश भवरे यांच्या त्या पत्नी होत




No comments:
Post a Comment