सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त; यापैकी ४१४ निकाली. १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 19, 2024

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त; यापैकी ४१४ निकाली. १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त.




मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.


विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News